शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

आघाडी सरकारने सत्तेचा वापर स्वत:ची मुलंबाळे व संस्थाच मोठया करण्यात केला - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2017 7:05 PM

आघाडी सरकारने सत्तेचा वापर स्वत:ची मुलंबाळे व संस्थाच मोठया करण्यात केला - मुख्यमंत्री

आघाडी सरकारने सत्तेचा वापर स्वत:ची मुलंबाळे व संस्थाच मोठया करण्यात केला - मुख्यमंत्रीराजीव लोहोकरे/किरण जाधव - वेळापूर आॅनलाईन लोकमतस्वातंत्र्यानंतर ज्यांनी नेतृत्व केले त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यत विकास पोहचू दिला नाही. स्वत:चा विकास साधत त्यांनी स्वत:च्या संस्था व मुलेबाळे मोठी केली. गोरगरीब सामान्य जनतेपर्यंत मूलभूत सुविधा न पोहचल्याने तो तसाच राहिला ही राज्याची शोकांतिका आहे. म्हणून राज्य शासन शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी बरोबरच शेतकऱ्यांना मुबलक वीज, पाणी देण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. राज्यापुढे आव्हाने खूप आहेत. परंतु आपण आव्हाने संपविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.वेळापूर येथील पालखी मैदानावर शेतकरी संघटनेचे उत्तमराव जानकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री ते उपस्थित कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.व्यासपीठावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आ. प्रशांत परिचारक, उत्तमराव जानकर, माढ्याचे संजय शिंदे, माळीनगर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे, सभापती रुपाली बेंदगुडे, अ‍ॅड. सुभाष पाटील, विठ्ठल शिंदे, के. के. पाटील आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडवणीस म्हणाले, शेतकरी हा खरा पोशिंदा असल्याने राज्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. शेतकऱ्यांना ८ हजार कोटी रु.ची थेट मदतीबरोबरच १७ हजार कोटी रुपयांची विविध उपक्रमाव्दारे आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील दुष्काळ निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित होता. त्यामुळे आपण जलयुक्त शिवार योजना हाती घेतली़ २२ हजार गावापैकी ४ हजार गावे दुष्काळ मुक्त झाली, त्याचे सर्वश्रेय जनतेला आहे.येत्या काळात राज्यासह सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करणार असून मागेल त्याला शेततळी यायोजने अंर्तगत १ वर्षात ८ हजार शेततळी या जिल्ह्यात निर्माण झाली असल्याचे सांगून सोलरपंप योजनेची गती वाढावी म्हणूनच फिडरच सोलारवर टाकुन शेतकऱ्यांना १२ महिने २४ तास वीज देणारा पायलट प्रकल्प बनविला़ तो केंद्राने देशातील पथदर्शक प्रकल्प म्हणून मंजुरी केल्याचे सांगत गोरगरीब जनतेच्या अन्न, पाणी व घरे तसेच शिक्षणासाठी शासनाचा संघर्ष चालू असून बीपीएलचे निकष बदलून योग्य लाभार्थ्यांनाच लाभ कसा मिळेल, याकडे लक्ष दिले जाईल. जेवढी घरे मागाल तेवढी घरे मिळतील या पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत २०२२ सालापर्यंत जेवढी मागणी असेल तेवढी घरे मिळणार, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी सुरू केलेल्या २५ हजार डिजीटल शाळांपैकी १७ हजार शाळा संपूर्णपणे ई-लर्निंग झाल्या़ त्यामुळे शिक्षणात देशात १८ व्या स्थानी असणारे महाराष्ट्र राज्य तिसऱ्या स्थानावर आले आहे़ भविष्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे़ राज्यातील आरोग्य व शासनाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ करोडो जनतेने घेतला असल्याचे सांगितले. ---------------------प्रस्थापितांना संपवा़़़माळशिरस तालुक्यात अनेक वर्षापासून प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित बंड करीत आहेत़ प्रस्थापितांना संपविल्या शिवाय ते थंड होणार नाही, अशी खरमरीत टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.----------------------२१ गावच्या पाण्याच्या प्रश्न सोडवावाप्रास्ताविकात उत्तमराव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे दोन वेळा प्रवेशाचा कार्यक्रम रद्द झाला होता, पण आता प्रतिक्षा संपली आहे. १३ वर्षापूर्वी भाजप आपण सोडला होता़ तालुक्याला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कुणीही पाठीशी नसताना लढलो. कारखाना उभारणीसाठीही १४ वर्षे गेली. आता भाजपात प्रवेश करताना काही लोक खोड्या करीत आहेत. परंतु आपण लढवय्या असल्याने तालुक्यातील गलिच्छ राजकारण पध्दत मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही. तालुक्यातील सहकारातील भ्रष्टाचार मुख्यमंत्र्यांनी मोडून काढावा, असे सांगून तालुक्याचा एमआयडीसी व निरा देवधर प्रकल्पातून २१ गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.