जालना : आगामी युग हे हिंदु समाजाचे राहणार, हा केवळ आशावाद नव्हे तर ती आजच्या समाजाची गरज आहे. जगाने अनेक विचारांवर आधारित प्रयोग राबवून पाहिले. पण प्रयोगांच्या फलितांचा विचार केला तर एकही प्रयोग सिद्धीस गेलेला नाही. म्हणूनच आजही जगाला मार्ग दाखविण्याची ताकद, समृद्ध परंपरा भारताकडे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी येथे केले.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात संघाच्या वतीने आयोजित ‘समरसता संगम’ अर्थात बौद्धिक वर्गात त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर श्री क्षेत्र सरला बेटचे अधिपती महंत रामगिरी महाराज, प्रांत संघचालक गंगाधर ज्ञानदेव पवार आदी उपस्थित होते. समतायुक्त, शोषणमुक्त, परमवैभवसंपन्न आणि सामर्थ्यसंपन्न देश बनवून जगाला मार्ग दाखविणारा विश्वगुरु भारत उभा करण्याच्या महाअभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.भागवत म्हणाले, तर्काने जग ऐकत नाही. जगाला जे सांगावयाचे आहे त्याला शक्ती हवी.
‘आगामी युग हे हिंदु समाजाचे’ - मोहन भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 5:28 AM