शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

आगामी निवडणूक लढवणारच : पतंगराव कदम

By admin | Published: June 15, 2017 7:24 PM

स्वर्ग आता केवळ दोन बोटेच राहिला आहे, असा समज काहींचा झाला असून अशा लोकांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण आगामी निवडणूक लढवणारच असल्याची घोषणा

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि.15 - स्वर्ग आता केवळ दोन बोटेच राहिला आहे, असा समज काहींचा झाला असून अशा लोकांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण आगामी निवडणूक लढवणारच असल्याची घोषणा माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी केली. डॉ. कदम सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. डॉ. कदम यांचा हा रोष भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या दिशेने होता. दरम्यान कर्जमाफीबाबत विरोधकांशीही चर्चा करण्याचे भाजपचे धोरण लोकशाहीत नक्कीच समाधानकारक आहे असे प्रशस्तीपत्र डॉ. कदम यांनी यावेळी देऊन टाकले. 
 
शासनाचे कर्जमाफीचे धोरण, शेतकरी आंदोलन याबाबत डॉ. कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी डॉ. कदम यांनी ही आपली शेवटची निवडणूक आहे. यापुढे आपण निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले होते. मात्र सध्या वाढत चाललेली भाजपची ताकद व पलुस कडेगाव मतदार संघातील पारंपरिक विरोधक देशमुख बंधू यांचे वाढते प्राबल्य यामुळे आगामी निवडणूक कदम कुटुबियांपैकी अन्य कोणी लढवली तर विरोधकांना ही निवडणूक सोपी जाईल अशी चर्चा सुरू आहे.  याबाबत बोलताना डॉ. कदम म्हणाले, आतापर्यंत अनेक उन्हाळे पावसाळे पाहीले आहेत. अनेक वादळं आली व गेली. सध्याची परिस्थिती पाहता आगामी निवडणूक मला लढवावीच लागेल. लोकसभा की विधानसभा हे मात्र ज्या त्या वेळी ठरवू.
 
शेती कर्ज व शेतीच्या प्रश्नांवर सर्व विरोधक अधिवेशनात सरकारवर तुटून पडले. विरोधकांनी एकत्र येऊन चांदा ते बांधा संघर्ष यात्रा काढली. त्यामुळे वातावरण ढवळुन निघाले. त्यातच पुणतांब्याच्या शेतकर्‍यांनी संप जाहीर केला. त्याचा राज्यभर परिणाम झाला. शेतकरी संपावर हे देशात पहील्यांदाच घडले. सरसकट कर्ज माफी व हमीभाव या मुद्यांवर हे आंदोलन झाले. देशभर याचे लोन पसरू लागले. राज्यातही गंभिर स्वरूप येऊ लागले. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घेतली. मात्र कर्जमाफी संदर्भात सुकाणू समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे तत्वता, व निकष याबाबत मात्र संभ्रमावस्था आहे. तत्वतः व निकष या शब्दांचा नेमका अर्थ समजला पाहीजे. 
 
कर्जमाफी संदर्भात निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धोरण ठरवण्यासाठी कॅबिनेट मंत्र्यांची समिती बनवण्यात आली. चंद्रकांतदादा पाटील हे सकारात्मक चर्चा करीत आहेत. सर्व विरोधकांचीही भेट घेऊन ते सर्वांचीच भूमिका समजाऊन घेत आहेत. लोकशाहीच्या दृष्टीने सरकारची ही भूमिका चांगलीच आहे असा शेराही डॉ. कदम यांनी देऊन टाकला. 
कर्जमाफीसह स्वामिनाथन्‌ आयोगाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. केवळ कर्जमाफीने काही होणार नाही. उत्पादन खर्चापेक्षा अधिक भाव मिळणे गरजेचे आहे. शेतीसाठीच्या सिंचन योजना तातडीने पूर्ण व्हायला पाहीजेत असे मत डॉ. कदम यांनी व्यक्त केले. 
जि.प. निवडणूकीत विरोधकांना नोटाबंदीचाच फायदा-
 
सामान्य जनता आमच्या सोबत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत सत्ताधार्‍यांना नोटा बंदीचा मोठा फायदा झाला. नोटा बंदीमुळे केवळ त्यांच्याकडेच पैसा मुबलक उपलब्ध झाला. त्यामुळेच त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडनणूकीत मोठं यश मिळले असल्याचा आरोप डॉ. कदम यांनी केला. हीच परिस्थिती कायम राहत नाहीत. लोक आमच्या सोबतच आहेत. आगामी काळात ती परिस्थिती राहणार नाही असेही स्पष्ट केले. 
वारसांनी कारखाना धुळीस मिळवला-
 
 डॉ. कदम यांनी वसंतदादंबद्दल अनेक आठवणी सांगितल्या. दादांनी कधीही जिल्ह्याच्या प्रगतीत राजकारण आणलं नाही. केवळ एका कारखान्यावर दादांनी राज्यावरच काय देशावर राज्य केलं. वारसांनी मात्र तोच कारखाना धुळीस मिळवला असा आरोप करीत पुन्हा एकदा विशाल पाटील यांना डिवचले.