शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

व्हॉटसअॅपचे आगामी उपयुक्त फीचर्स

By admin | Published: July 22, 2016 9:52 PM

व्हॉटसअॅप म्हणजे स्मार्टफोन यूजर्सचा जीव की प्राण. जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी संपर्काचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे व्हॉटसअॅप.

- मयूर देवकरव्हॉटसअॅप म्हणजे स्मार्टफोन यूजर्सचा जीव की प्राण. जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी संपर्काचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे व्हॉटसअॅप. युजर्सच्या सुविधेसाठी कंपनी नेहमीच नवनवीन अपडेट्सच्या माध्यमातून नवे फीचर्स आणत असते. येत्या काही काळात असेच अनेक एक्सायटिंग आणि उपयुक्त फीचर्स व्हॉटसअॅपमध्ये दिसणार आहेत. कोणते असणार ते फीचर्स? १. कॉल बॅकव्हॉटसअॅप कॉलिंगची सुविधा उपलब्ध झाल्यापासून कॉल बॅकची मागणी केली जात असे. अखेर नव्या 2.16.189 व्हर्जनमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे. जेव्हा कॉल रिजेक्ट केला जाईल तेव्हा अ‍ॅप स्क्रीनवर कॉल बॅकचे आॅप्शन दिसेल. अद्याप हे फीचर केवळ अँड्राईडसाठी असून ते फक्त व्हॉटसअॅपच्या लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.२. नवीन फॉण्टव्हॉटसअॅपवर चॅट करताना तोच तोच फॉण्ट पाहून बोर झालात? तर मग तुमच्यासाठी नवी अपडेट फार सुखवणारी गोष्ट आहे. अँड्राईड यूसर्जसाठी कंपनीने दुसऱ्या फॉण्टमध्ये लिहिण्याची सुविधा दिली आहे. हा नवीन फॉण्ट विंडोजच्या 'फिक्सड्सिस' सारखाच दिसतो. नवीन फॉण्ट वापरण्यासाठी टेक्स्टच्या आधी व नंतर तीनदा (ै) हे चिन्ह वापरावे लागेल.३. म्युझिक शेअरिंगव्हॉटसअॅप लवकरच म्युझिक शेअरिंग फीचर देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याची सुरुवात अ‍ॅपल युजर्सपासून करण्यात येण्याची शक्यता आहे. या फीचरद्वारे आपल्या स्मार्टफोनमध्ये असणारे गाणे व अ‍ॅपल म्युझिक सर्व्हिसवरील गाणे यूजर्स एकमेकांशी शेअर करू शकतील.४. 'मेन्शन' आणि ग्रुप इन्व्हाइटफेसबुकप्रमाणेच आता व्हॉटसअॅपवरही ग्रूपमध्ये चॅट करत असताना 'मेन्शन' ही सुविधा देण्यात येणार आहे. ग्रूपमध्ये एका विशिष्ट सदस्याला उद्देशून मेसेज पाठवताना त्याचे नाव 'मेन्शन' केले असता ते वेगळ्या रंगात दिसेल. ग्रुप इन्व्हाइट फीचरद्वारे तुम्ही इतर लोकांना ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी लिंक पाठवू शकता. लिंकवर क्लिक केले असता ते ग्रुपमध्ये अ‍ॅड होतील.५. जीआयएफआयओएस प्लॅटफॉर्मवर व्हॉटसअॅपमध्ये लवकरच ह्यजीआयएफह्ण इमेजेस अपलोड केल्या जाऊ शकणार आहेत. आयओएस बीटा व्हर्जन 2.16.7.1 मध्ये हे फीचर सर्वप्रथम सामील करण्यात आले होते. स्पर्धक इस्टंट मेसेंजर वुईचॅट आणि लाईन या अ‍ॅप्समध्ये आगोदरच ही सुविधा आहे.६. मोठ्या आकाराच्या इमोजीपुढील अपडेटमध्ये मोठ्या आकाराच्या इमोजी देण्यात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अ‍ॅपलनेदेखील अशाच प्रकारची घोषणा आगामी आयओएस १० साठी केली आहे.