बना lokmat.com फॅमिली No. 1 : contest.lokmat.com
मनुष्य हा सुद्धा भोवतालच्या निसर्गाचाच एक अंश असतो. संस्कृतीच्या माध्यमातून जीवनातील अनेक चढ-उतार मनुष्य पादाक्रांत करत असतो. जीवन सुखी, समृद्ध आणि आकर्षक व्हावे, यासाठी संस्कारांच्या संस्कृतीची गरज असते. मनावर घडणारा हा संस्कार म्हणजे संस्कृतीचा आध्यात्मिक भाग होय. भारतीय संस्कृती ही जगभरात नावाजली जाते. पाश्चिमात्यांमध्येही भारतीय संस्कृतीचे गोडवे गायले जातात. भारतातील रुढी-परंपरा या सदोदित परदेशी पर्यटकांना आकर्षित करतात. एकत्र कुटुंब पद्धत फक्त भारतातच आजमितीस पाहायला मिळते. अशी ही भारतीय संस्कृती देशाच्या इतिहासामुळे, विलक्षण भूगोलामुळे आणि जनतेतील वैविध्यामुळे आकारास आलीय.
शेजारच्या देशांतील चालीरीती, परंपरा व कल्पना सामावून घेत भारतीय संस्कृतीने सिंधुसंस्कृतीदरम्यान जन्माला आलेले, तसेच वैदिक काळात, दक्षिण भारतातील लोहयुगकाळात, बौद्ध धर्माच्या उद्भव आणि ऱ्हासाच्या काळात, तसेच भारताचे सुवर्णयुग, मुसलमानी आक्रमण व युरोपियन देशांच्या वसाहतींदरम्यान झालेले बदल पचवूनदेखील, स्वतःचे परंपरागत प्राचीनत्व टिकवून ठेवले आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील लोक, धर्म, वातावरण, भाषा, चालीरीती आणि परंपरा यात वैविध्य असून, त्यात आढळणारे साम्य हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. देशभरात पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोट म्हणजे भारतीय संस्कृती होय. ती अनेक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंचे व योगशिक्षकांचे आश्रयस्थान आहे. देशातील विविधरंगी धार्मिक उत्सव, संगीत, नृत्ये, स्थापत्यशैली यातील कलात्मक बंध, तशीच भौगोलिक रचना आणि इथला पुरातन व आधुनिक संस्कृतींचा मिलाप ह्या गोष्टी जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करत असतात. देशात बहुसंख्य लोकांच्या जीवनात धर्माची मध्यवर्ती व निश्चित अशी भूमिका आजही आहे. भारतात हिंदू, मुस्लीम, बौद्ध, जैन व शीख असे अनेक धर्मांचे लोक राहतात, आणि सगळे सण उत्साहानं एकत्र साजरे करतात.
वर्षभर भारतात कुठल्या ना कुठल्या सणाचा माहोल असतो, परंतु या सणासुदीचा मेरुमणी म्हणजे दिवाळी. जीवनामध्ये प्रकाशाचं महत्त्व सांगणाऱ्या दिपावलीमध्ये धन्वंतरीची पुजा, नरकासूररुपी असूर वृत्तीचा नाश, भाऊबीजेला बहिण भावाच्या गोड नात्याचा आनंद, संपत्तीची अवहेलना न करता तिला सन्मान देणारे लक्ष्मीपूजन अशा विविध अंगांनी घरा घरामध्ये दिवाळीचा सण बहरतो. कुटुंब संस्था हे जे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे, त्याचा पुरेपूर अविष्कार दिवाळीमध्ये अनुभवायला मिळतो.
तर तुमच्या कुटुंबांची दिवाळी साजरी करा आमच्यासोबत एका काँटेस्टच्या माध्यमातून... लोकमत.कॉमच्या फॅमिली नंबर 1 या स्पर्धेमध्ये तुमच्या फॅमिलीचा फोटो पाठवा आणि जिंका आकर्षक बक्षीसे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा...