शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 12:24 PM

Eknath Shinde Coronavirus Positive : सोमवारी त्यांनी मुंबई आणि नवी मुंबईतील विकासकामांची केली पाहणी केली होती. संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. राज्यातील मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि काही नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यापूर्वी दिली होती. आता राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सोमवारी त्यांनी मुंबई आणि नवी मुंबईतील विकासकामांची केली पाहणी केली होती.

"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या," असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

यापूर्वीही राज्यातील नेत्यांना कोरोनाची लागणगेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्येचा (Coronavirus Patients) खाली येणार आलेख आता पुन्हा वर जाऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. तर दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा विषाणूसह (Delta Variant), ओमायक्रॉनच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. अधिवेशनाच्या पाच दिवसांमध्ये राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी दिली होती. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस