अहमदनगर : ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नांबाबत सोमवारी नोंदणीकृत कामगार संघटना, साखर संघ व शासन प्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. त्यामुळे आंदोलन ९ नोव्हेंबरपर्यंत स्थगित केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष बबनराव ढाकणे यांनी दिली. मजुरांचा करार व मजुरीप्रश्नी शासनाच्या लवादाने नुकताच घेतलेला निर्णय अमान्य करत ऊसतोडणी मजुरांनी संप कायम ठेवला आहे. (प्रतिनिधी)
ऊसतोड मजूरप्रश्नी सोमवारी मुंबईत बैठक
By admin | Published: November 07, 2015 2:59 AM