मुंबई : व्यावसायिक दौ-यावर भारतात आलेल्या ५२ वर्षीय अमेरिकन महिलेसोबत ओमानच्या दोन तरूणांनी गैरवर्तन केले. ही घटना बुधवारी मध्यरात्री हॉटेल ताजमध्ये घडली. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी दोघांना विनयभंगाच्या गुन्हयात अटक केली. यापैकी मुख्य आरोपी हॉटेलमध्ये पाऊल ठेवल्यापासून आपल्या मागावर होता, सतत पाठलाग करत होता, असा आरोपही अमेरिकन महिलेने केला आहे.तक्रारदार अमेरिकन महिलेने पोलिसांनी दिलेल्या जबाबानुसार, तिची स्वत:ची कंपनी असून ती व्यावसायिक कामासाठी २२ फेब्रुवारी रोजी हॉटेल ताजमध्ये उतरली. हॉटेलच्या बारमध्ये महोम्मद हुसेन दरवीश या ओमानच्या तरूणाशी तिची ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. मोबाईलद्वारे ते एकमेकांशी संपर्कात होते. गुरूवारी हॉटेलच्या बारमध्ये ते पुन्हा भेटले. तेव्हा अमेरिकन महिलेने दारवीशला आपल्या रूममध्ये दारू पिण्यासाठी आमंत्रण दिले. ठरल्याप्रमाणे रात्री बाराच्या सुमारास दारविश तिच्या रूममध्ये गेला. दीडच्या सुमारास अमेरिकन महिला स्वच्छतागृहात गेली. ती परत आली तेव्हा दारविशसोबत सुलतान फहाद अलघटानी हा तरूण रूममध्ये आढळला. हा तरूण माझ्या मागावर आहे, त्यामुळे त्याची उपस्थिती मला पटलेली नाही, तुम्ही दोघेही माझ्या रूममधून बाहेर पडा, असे या अमेरिकन महिलेने दारविशला बजावले. तेव्हा दारविश बाहेर पडला. मात्र सुलतान तेथेच थांबला.
हॉटेल ताजमध्ये अमेरिकन महिलेचा विनयभंग
By admin | Published: February 28, 2015 5:18 AM