शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

रेल्वेमध्ये ब्रेल लिपीचा वापर

By admin | Published: May 24, 2015 1:43 AM

आता अंध प्रवाशांसाठी रेल्वे बोगीत आसन व्यवस्था, शौचालय, दरवाजे, वॉश बेसीन आदी ठिकाणी ब्रेल एम्बेडेड (अंध लिपी) प्लेट लावण्यात येत आहेत.

अविनाश चमकुरे ल्ल नांदेडप्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. आता अंध प्रवाशांसाठी रेल्वे बोगीत आसन व्यवस्था, शौचालय, दरवाजे, वॉश बेसीन आदी ठिकाणी ब्रेल एम्बेडेड (अंध लिपी) प्लेट लावण्यात येत आहेत. दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने राज्यात प्रथमच अशा प्लेटचा रेल्वेगाडीत वापर केला आहे.नांदेड-पुणे एक्स्प्रेसच्या शयनयान, एसी डब्यात ब्रेल लिपीतील सूचना फलक लावण्यात आले आहेत. आसनव्यस्था, कोच क्रमांक, शौचालय, वॉश बेसीन, आपत्कालीन खिडकी, अलार्म चेन, बर्थ आदी ठिकाणी ब्रेल लिपी असलेले बोर्ड लावण्यात आले आहेत़ त्यामुळे कोणाच्याही मदतीविना अंध प्रवासी आरक्षित आसनापर्यंत सहज पोहचू शकतील़ तसेच विविध सुविधांचाही उपयोग सुलभतेने करतील़ ब्रेल एम्बेडेड बोर्ड वापरात आणण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असून त्याची सुरुवात नांदेडमधून झाली. नेत्रहीन व्यक्तींचा प्रवास सुकर व्हावा, या हेतूने २०१३-१४च्या रेल्वे अर्थसंकल्पात विशेष कोच तयार करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार चेन्नई येथील इंटीग्रल कोच कारखान्यात ब्रेल एम्बेडेड बोर्ड तयार करण्यास प्रारंभ झाला़ १६ फेब्रुवारी २०१४ रोजी नवी दिल्ली-पुरी (ओरिसा) पुरुषोत्तम सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील कोचेसमध्ये सर्वप्रथम ब्रेल एम्बेडेड बोर्ड लावण्यात आले़ आता सर्वच गाड्यातील जुने बोर्ड काढून नव्याने तयार केलेले बोर्ड बसविले जात आहेत़