शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

हृदय नेण्यासाठी होणार ड्रोनचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2015 4:19 AM

महिनाभरापूर्वीच ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून पुण्यातील एका महिलेच्या हृदयाचे मुंबईतील एका तरुणामध्ये यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. यासाठी तब्बल ४०० ते ५०० लोकांची टीम कामाला

- समीर कर्णुक,  चेन्नईमहिनाभरापूर्वीच ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून पुण्यातील एका महिलेच्या हृदयाचे मुंबईतील एका तरुणामध्ये यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. यासाठी तब्बल ४०० ते ५०० लोकांची टीम कामाला लागली होती. शिवाय ही पद्धत मोठी खर्चीक असल्याने यापुढे अशा प्रकारे अवयव वाहतुकीसाठी ड्रोनचा वापर करण्याचा विचार फोर्टीस रुग्णालयाकडून करण्यात येत आहे. चेन्नाईत नुकताच हा प्रयोग फोर्टिस रुग्णालयाने यशस्वीरीत्या पार पाडला. यात १० किलोमीटरचे अंतर सुमारे आठ मिनिटांत कापण्यात आले होते. अवयवदानाबद्दल सध्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती पाहायला मिळत आहे. त्यामुळे हृदय प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रियादेखील वाढल्या आहेत. हृदय प्रत्यारोपण करताना वेळेची मर्यादा ही सर्वात महत्त्वाची बाब ठरते. यासाठी मनुष्यबळ आणि खूप खर्च येतो. सध्या देशात आठ ते दहा दिवसांनी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत आहे. यासाठी पोलीस, विमानतळ प्रशासन आणि रुग्णालयातील कर्मचारी वर्ग यांना पूर्वसूचना देऊन ग्रीन कॉरिडोर निर्माण करावे लागते. मात्र दिवसातून अनेकदा ग्रीन कॉरिडोर करणे शक्य होणार नाही. शिवाय त्यामुळे वाहतूक आणि इतर व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात परिणामदेखील होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन चेन्नईतील फोर्टीस रुग्णालयाने अवयवांची ने-आण करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वीच एक प्रयोगही केला. तो पूर्णपणे यशस्वी झाल्याची माहिती फोर्टीस रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. के. आर. बालकृष्णन यांनी दिली.