पुणे - राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार, महावितरणच्या वीजबिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही १० टक्के दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढत असताना महावितरणच्या वीजग्राहकांना १ एप्रिलपासून वीजदरवाढीचा ‘शॉक’ बसणार आहे. परिणामी वीजबिलात किमान पन्नास रुपयांची वाढ होणार आहे.राज्यातील विजेचे दर देशात सर्वाधिक असतानाच, ‘महावितरण’ने गेल्या वर्षी सादर केलेली वीजदरवाढीची याचिका राज्य वीज नियामक आयोगाने मंजूर केली.
अशी वाढ हाेईल तुमच्या बिलात वीजवापर (युनिट्स) जुने दर नवे दर० ते १०० ५.५८ रुपये ५.८८ रुपये१०१ ते ३०० १०.८१ रुपये ११.४६ रुपये३०१ ते ५०० १४.७८ रुपये १५.७२ रुपये५०१ ते १००० १६.७४ रुपये १७.८१ रुपये