शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

कोरड्या चर्चांपेक्षा मराठी भाषेचा वापर करा

By admin | Published: February 11, 2016 2:17 AM

‘मराठी भाषा कशी जगवायची याच्या कोरड्या चर्चा करत बसण्यापेक्षा व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. लिहिणे ही गोष्ट छंद किंवा निव्वळ आवड न राहता जेव्हा जगणे

पुणे : ‘मराठी भाषा कशी जगवायची याच्या कोरड्या चर्चा करत बसण्यापेक्षा व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. लिहिणे ही गोष्ट छंद किंवा निव्वळ आवड न राहता जेव्हा जगणे बनते त्याच वेळी सकस साहित्यनिर्मिती होऊन भाषा वाढीस लागते,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी केले.साहित्य संस्कृती मंच संस्थेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आकाशवाणीचे सहायक वृत्तसंचालक नितीन केळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘अलीकडच्या काळात प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांच्यातील भेद पुसट व्हायला लागले आहेत. प्रसारमाध्यमेही बोलीभाषेचा वाढता वापर करीत आहेत. त्यामुळे माध्यम साक्षरता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन केळकर यांनी केले. राजा परदेशी स्मृतिपुरस्कार रत्नमाला खिंवसरा यांना देण्यात आला. कथालेखन, कवितालेखन, उखाणे, कथावाचन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.त्यापूर्वी सदस्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संस्थेच्या कार्यवाह स्वाती महाळंक यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष अरुणा महाळंक यांनी प्रास्ताविक केले. अनिल स्वकुळ यांनी याप्रसंगी उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)