पुणे : दि कॉसमॉस को-ऑपरेटीव्ह या मल्टी शेड्युल्ड बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक (२०२०-२०२५) निवडणूकीमधे डॉ. मुकुंद अभ्यंकर यांच्या उत्कर्ष पॅनेलने कृष्णकुमार गोयल यांच्या सहकार पॅनेलचा धुव्वा उडवित सर्व जागांवर विजय संपादन केला. डॉ. अभ्यंकर यांना सर्वाधिक ५ हजार २२ मते मिळाली. सहकार क्षेत्रातील या अग्रणी बँकेचीनिवडणूक २२ डिसेंबर रोजी झाली. शुक्रवारी (दि. २७) कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉलमधे मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शैलेश कोतमिरे यांनी काम पाहिले. या निवडणुकीत सहकार पॅनेलकडून विद्यमान सात संचालकांसह माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यानंतरही, सहकार पॅनेलच्या एकाही सदस्याला विजय मिळविता आला नाही. मतदारांनी बँकेचे समुह अध्यक्ष डॉ. अभ्यंकर आणि विद्यमान अध्यक्ष मिलिंद काळे यांच्यावर विश्वास ठेवला. विद्यमान अध्यक्ष काळे यांच्या काळातच कॉसमॉस बँकेवर ९४ कोटी रुपयांचा सायबर हल्ला झाला होता. सभासदांना लाभांश देणे बँकेला शक्य झाले नव्हते. विरोधकांनी निवडणुकीत हा प्रचाराचा मुद्दा केला होता. उत्कर्ष पॅनेलमधील काही व्यक्तींच्या वयाचा मुद्दा देखील उपस्थित केला होता. उत्कर्ष पॅनेलने उच्चशिक्षित तरुणांना संधी दिली. उच्चशिक्षित व्यक्तींच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन केले होते. त्याला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला.बँकेच्या पुण्यासह गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात शाखा आहेत. बँकेचे एकूण ८० हजार सभासद असून, त्यातील ५९ हजार जणांना मतदानाचा अधिकार होता. त्यातील ३६ हजार सभासद पुणे आणि ८ हजार उर्वरीत राज्यात आहेत. तर, परराज्यातील सभासद मतदारांची संख्या १५ हजार आहे. ------------
विजेत्या उत्कर्ष पॅनेलमधील उमेदवारांना मिळालेली मते
डॉ. मुकुंद अभ्यंकर ५०२२मिलिंद काळे ४९६३अॅड. प्रल्हाद कोकरे ४३९५यशवंत कासार ४२९७सचिन आपटे ४६६३अजित गिजरे ४३१७मिलिंद पोकळे ४२५४राजेश्वरी धोत्रे ४३९७जयंत बर्वे ४७०२प्रवीणकुमार गांधी ४३९०नंदकुमार काकिर्डे ४३७३अरविंद तावरे ४२४०अॅड. अनुराधा गडाळे ४३३३------------