शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

उत्तम जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट! सस्पेन्स कायम, म्हणाले, "अंतिम निर्णय..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 10:49 AM

Lok Sabha Election 2024 : शरद पवार यांची भेट झाल्यानंतर उत्तम जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पुणे : सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे वजनदार नेते धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यानतंर आता शरद पवार यांनी ही जागा जिंकण्यासाठी डावपेच सुरू केले आहेत. या मतदारसंघातील दुसरे वजनदार नेते उत्तम जानकर यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, मोहिते - पाटील आणि उत्तम जानकर हे पारंपरिक विरोधक. पण, आताच्या लोकसभा निवडणुकीनिमित्ताने एकत्र येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. 

या भेटीनंतर उत्तम जानकर यांनी अंतिम निर्णय १९ तारखेला होईल, असे म्हणत माढ्यातील सस्पेन्स कायम ठेवला आहे. शरद पवार यांची भेट झाल्यानंतर उत्तम जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उत्तम जानकर म्हणाले, "माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांची बैठक झाली. शरद पवारांची इच्छा होती की, मी आणि मोहिते यांनी एकत्र यावं. याबाबत येत्या २, ३ दिवसात दुसरी बैठक होईल. १९ तारखेला माळशिरस आमदारकीबद्दल चर्चा होईल."

शरद पवार यांच्यासोबत माढामधील लोकांनी काय केले पाहिजे, याबद्दल चर्चा झाली. आमच्या तालुक्यातील लोकांची इच्छा आहे की, शरद पवारांसोबत जावे. आम्ही एकत्र आलो तर मी माळशिरसचा आमदारकीचा उमेदवार असू शकतो. कार्यकर्त्यांची भावना १९ तारखेला अंतिम होईल. १९ तारखेला अंतिम निर्णय होईल, असे उत्तम जानकर यांनी सांगितले. याशिवाय, कार्यकर्त्यांमध्ये मतमांतर असू शकतं. मी कुठल्याही प्रवेश पक्षात करणार नाही. मी सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहे. जरी मी अजित पवार गटात असलो, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलो होतो, असेही उत्तम जानकर यांनी स्पष्टपणे सांगितले.

याचबरोबर, धैर्यशील मोहिते म्हणाले, 'शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं आहे. १९ तारखेला मेळावा होईल आणि त्यातून निर्णय होईल. राजकीय वैर संपायला पाहिजे हीच भूमिका आहे. रामराजे महायुती सोबत आहेत, त्यांचे सर्व कुटुंब आमच्या सोबत आहेत. चांगल्या मताने निवडून येऊ'.

लोकसभेला मोहिते; विधानसभेला जानकर ?माळशिरस विधानसभा मतदारसंघात २०१९च्या निवडणुकीत उत्तम जानकर यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला. जानकर हे राष्ट्रवादीकडून लढले तर विरोधात भाजपाचे राम सातपुते होते. आता लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी मोहिते यांना साथ द्यायची तर विधानसभेला सहकार्य घ्यायचे, असे ठरू लागल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच जानकर यांनीही मतदारसंघात भाजपाविरोधात नैराश्याचे वातावरण आहे. आम्हाला मोहिते लांबचे नाहीत. मोहिते यांच्याबरोबर युती करा, याच तालुक्यात आमदार, खासदार असावा, ही भावना लोकांमध्ये बळावली, असे वक्तव्य केले आहे. यावरून जानकर यांची मोहितेंशी जवळीक वाढल्याचेच दिसून येत आहे.

टॅग्स :madha-pcमाढाSharad Pawarशरद पवारSolapurसोलापूरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४