राजानंद मोरे पुणे : राज्यात वाहनांच्या नोंदणीपासून तपासणी, कर वसुली, परवाने देणे अशी अनेक महत्त्वाची कामे करणाºया परिवहन विभागातील जवळपास निम्मी पदे रिक्त आहेत. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना रिक्त पदांमुळे यंत्रणेवरील ताण वाढून कामाची गती मंदावल्याचे चित्र पहायला मिळत आहे.राज्यात परिवहन विभागाची एकूण १५ प्रादेशिक परिवहन कार्यालये व ३५ उप प्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. या कार्यालयांमार्फत वाहनांची नोंदणी करणे, वाहन कर व प्रवासी कर वसुली, चालक परवाने देणे, प्रवासी-माल वाहतुक परवाने देणे, वाहनांची तपासणी, वाहनांच्या वायुप्रदूषणावर नियंत्रण ठेवणे अशी सर्व प्रकारच्या वाहनांशी संबंधित विविध कामेकेली जातात. तसेच राज्याच्या सीमेलगत एकूण २२ तपासणीनाके आहेत. या नाक्यांवर प्रामुख्याने परप्रांतातून येणाºया वाहनांची तपासणी व कर वसुली करण्याची कामे विभागाला करावी लागतात.विभागाला वर्ग १ ते ४ पर्यंत सप्टेंबर महिनाअखेरीस ५ हजार१०० पदे मंजूर आहेत. त्यामध्ये वर्ग तीनची सर्वाधिक ३५६६ तर वर्ग एकची १०६१ पदे आहेत. वर्ग दोनची पदे ४६ असून वर्ग चारची ४२७आहेत. एकूण मंजूर पदांपैकी सध्या केवळ २ हजार ८१७ पदे भरलेली असून तब्बल २ हजार २८३ पदे रिक्त आहेत. वर्ग एकच्या ४२६ रिक्त पदांमध्ये सर्वाधिक ३७३ पदे मोटार वाहन निरीक्षकांची आहेत. वर्ग तीनमधील सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या १३०० पैकी तब्बल १ हजार जागा रिक्त आहेत.सप्टेंबर अखेरपर्यंत वर्गनिहाय पदांची स्थिती-वर्ग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे रिक्त पदांची टक्केवारीवर्ग -१ १०६१ ६३५ ४२६ ४०.१५वर्ग -२ ४६ २० २६ ५६.५२वर्ग -३ ३५६६ १९५३ १६१३ ४५.२३वर्ग -४ ४२७ २०९ २१८ ५१.०५एकूण ५१०० २८१७ २२८३ ४४.७६
परिवहन विभागातील निम्मी पदे रिक्त : वाहनांची संख्या वाढल्याने यंत्रणेवरील ताण वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 2:56 AM