मुंबई : राज्यात शुक्रवारी २ लाख ५४ हजार ९६५ जणांना लस देण्यात आली. यातील २ लाख ४६ हजार ९५४ जणांना कोविशिल्ड, तर ८ हजार २ जणांंना कोव्हॅक्सिन लसीचा डाेस देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण २६ लाख ८९ हजार ९२२ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली. (Vaccination of more than 26 lakh people in the state)काेराेनाचा संसर्ग वाढत चालला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण माेहीम वेगात सुरू आहे. मुंबईतही १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. १ मार्चपासून ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
राज्यात २६ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 7:14 AM