शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

वडिवळे धरणाच्या देखभालीकडे होतेय दुर्लक्ष

By admin | Published: May 19, 2016 2:23 AM

सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने या वर्षी वडिवळे धरणात पाणीसाठा ३३ टक्केच आहे

करंजगाव : सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने या वर्षी वडिवळे धरणात पाणीसाठा ३३ टक्केच आहे. पाणी काटकसरीने वापरण्याची गरज असताना पाणी गळतीकडे आणि धरणाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वडिवळे धरणाचा कालवा करंजगाव, गोवित्री, साबळेवाडी, कांबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नाणे, कोळवाडी व इतर गावांतून गेला आहे. दोन दशकांपूर्वी प्रत्येक शिवार हे सुजलाम् सुफलाम् होते. परंतु कालवा असूनही पाणी वेळेवर मिळत नाही. शिवाय काही गावांना कालव्याचे पाणी बंद झाले आहे. कालवा बंद झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी कालवा पूर्णपणे बुजवला असून त्या ठिकाणी शेती केली जाते. कालवा काही ठिकाणी नादुरुस्त आहे. मावळात धरण असूनदेखील ही काही गावांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेती ओसाड झाली आहे. वर्षाला एकच पीक घेण्याची वेळ तेथील शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाळ्यातील पाण्याशिवाय शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नसून कालवा सुरू होण्याची शेतकरी दोन दशके प्रतीक्षा करीत आहे. पाण्याची कसलीच सोय केली जात नसल्याने वडिवळे धरणालगतचे क्षेत्र ओसाड आहे. काही ठिकाणी जनावरे छावणीत बांधली जातात. परंतु चारा मिळत नाही. धरणाच्या पायथ्याच्या मध्यभागी पाणी सोडण्यासाठीची व्हॉल्व्ह आहे. तेथे जाण्यासाठी सुमारे ४५ फूट उंचीचा लोखंडी जिना आहे. तो तुटलेला असून, गंजही चढला आहे. जोखीम पत्करूनच कामगारांना तेथे जावे लागते. धरणावरील विद्युतविषयक समस्या मोठ्या प्रमाणात असून फ्युज डीपी, वायर, बोर्ड, बटण खराब अवस्थेत आहे. काही ठिकाणी होल्डरला बल्ब नाही. वायर लोंबलेल्या अवस्थेत आहेत. धरणाच्या पायाचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. पाणी सोडले जाते त्या ठिकाणी भिंतीचे सिमेंट निघून गज दिसू लागले आहेत. ते गंजण्याची शक्यता आहे. धरणाला लागूनच अनेक छोटी-मोठी गावे आहेत. जलाशयात एखादी दुर्घटना घडल्यास मदतीसाठी होडी अथवा लॉँच नाही. जुनी होडी दुरवस्थेत पडून आहे. धरणातील पाणी इतर गावांना सोडण्यासाठी कालव्याचा वापर केला जातो. परंतु कालव्याला लागूनच अनेक झुडपे आहेत. माळरानातून येणारी माती कालव्यात पडत आहे.मावळ तालुका जास्त पर्जन्यमानाचा असला, तरी शेतकऱ्यांना पाण्याअभावी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नाणे मावळात पाणी असूनही दुष्काळी परिस्थिती आहे. काही ठिकाणी टॅँकरच्या साह्याने पाणी पुरवावे लागते. प्रशासनाने परिसर जलयुक्त करणे गरजेचे असून, कालवे व्यवस्थित करून पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच धरणावरील इतर कामे करून सुविधा पूर्ण करून गरजेचे आहे, अशी नागरिकांची मागणी आहे. शेतकऱ्यांना करंजगाव शिवारात पाणी देण्यासाठीची वाहिनी अर्धवट अवस्थेत सोडली आहे. पुढील काम कधी चालू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे, अशी करंजगावचे तंटामुक्ती अध्यक्ष कैलास वाटाणे यांनी सांगितले. पाटबंधारे विभागाकडे चौकशी केली असता, जलवाहिनीचे उर्वरित काम निधी आल्यानंतर चालू होईल. काही वस्तू जीर्ण झाल्यात त्या बदलल्या जातील, असे जाधव यांनी सांगितले.