वायकर यांनी सोमय्या यांच्या विरोधात दाखल केला १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 03:17 PM2021-04-02T15:17:34+5:302021-04-02T15:19:10+5:30

Ravindra Waikar Vs. Kirit Somaiya : मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, महाकाली गुंफा जमीन घोटाळ्याचे केले होते आरोप

Vaikar has filed a defamation suit against Somaiya for Rs 100 crore | वायकर यांनी सोमय्या यांच्या विरोधात दाखल केला १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

वायकर यांनी सोमय्या यांच्या विरोधात दाखल केला १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

Next
ठळक मुद्देमुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखलमहाकाली गुंफा जमीन घोटाळ्याचे केले होते आरोप

शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात मुबई उच्च न्यायालयात १०० कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमीन प्रकरणी सातत्याने आरोप करुन आपली, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची नाहक बदनामी करुन जनमानसातील लोकप्रतिनिधीची प्रतीमा मलिन करुन मानसिक त्रास दिल्या प्रकरणी हा दावा दाखल केल्याची माहिती वायकर यांनी दिली. 

"अलिबाग कोर्लई येथील संपुर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून संयुक्तरित्या खरेदी केलेल्या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आणि वरील माहिती निवडणुक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध समाजमाध्यमांद्वारे केला होता. यावेळी या जमिनीवरील बंगल्याचा वापर व्यवसायासाठी केल्याचा तसेच या दोघांमधील आर्थिक हितसंबंध काय आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला होता. परंतु त्यांचे या सर्व निराधार आरोपात काहीच तथ्य नसल्याचे विविध प्रसामाध्यमांनीच पुढे उघडकीस आणल्याने सोमय्या या प्रकरणी तोंडघशी पडले," असंही वायकर यांनी नमूद केलं. 

"महाकाली गुंफा येथील जमिनप्रकरणी वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवांकडून २५ कोटी रुपयांचा मोबदला मिळाल्याचा आरोपही सोमय्यांनी पत्रकार परिषदेत विविध समाजमाध्यमांद्वारे केला. हे आरोप करतानाही त्यांनी कुठलेही सबळ पुरावे सादर केले नाहीत. किरीट सोमय्या हे सातत्याने स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी लोकप्रतिनिधीची आपली जनमानसातील प्रतीमा, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची प्रतिमा मलिन करुन मानसिक त्रास देत आहेत," असं म्हणत वायकर यांनी सोमय्या यांना या दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास सिव्हील व क्रिमिनल कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सोमय्या यांना नोटीसद्वारे दिला होता. "एवढेच नव्हे या दोन्ही प्रकरणी मुंबई पोलिस आयुक्त तसेच एम.आय.डी.सी पोलिस ठाण्यास पत्र देऊन बेताल व चुकीचे वक्तव्य करुन जनमानसातिल लोकप्रतिनिधीची प्रतीमा मलिन करणार्‍या किरीट सोमय्या यांना लगाम घालण्याची उचित ती कारवाई करण्याची विनंतीही या अगोदर केली होती," असं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान आमदार रविंद्र वायकर यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा अबुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. एवढेच नव्हे तर लवकरच याप्रश्‍नी क्रिमिनल दावाही दाखल करणार असल्याचं वायकर यांनी सांगितले. 
 

Web Title: Vaikar has filed a defamation suit against Somaiya for Rs 100 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.