मुंबई: काँग्रेसचे दिवंगत राज्यसभा खासदार डॉ. राजीव सातव (Rajeev Satav) यांचा मागच्या वर्षी 16 मे रोजी कोरोना संसर्गामुळे रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर आज व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने त्यांच्या पत्नी आणि विधान परिषद आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav) राजीव यांच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
डॉ. प्रज्ञा सातव यांचे ट्वीट-
प्रज्ञा सातव यांनी ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या. 'डिअर राजीव जी, तुम्ही जिथे कुठे असाल, मला तुम्हाला एकच सांगायचे आहे, माझे कालही आजही आणि उद्याही तुमच्यावर प्रेम असेल. मी तुमच्यावर निरंतर प्रेम करत राहीन', अशा ओळींमधून प्रज्ञा सातव यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली.
प्रज्ञ सातव यांची विधान परिषदेवर वर्णीडॉ. राजीव सातव आणि डॉ. प्रज्ञा सातव यांचा 2002 विवाह झाला होता. 19 वर्षांच्या संसारानंतर कोरोना संसर्गामुळे राजीव सातव यांचे निधन झाले आणि दोघांची ताटातूट झाली. डॉ. राजीव सातव यांचे 16 मे 2021 रोजी पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. कोरोना संसर्गानंतर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव राहुल गाँधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जायचे. राजीव सातव यांच्या निधनानंतर पत्नी प्रज्ञा सातव यांना पक्षाने विधान परिषदेवर पाठवायचे ठरवले. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लावण्यात आली.