केज (जि. बीड) - अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज न्यायालयानेन्यायालयीन कोठडी सुनावलेला मकोकातील आरोपी वाल्मीक कराड याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सुनावणी गुरुवारी केज न्यायालयात होणार आहे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात केज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. शनिवारी आरोपीचे वकील ॲड. अशोक कवडे यांनी सुनावणी पुढे ढकलण्यासाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे सोमवारी (दि. २०) सुनावणी ठेवली होती. परंतु,आपल्याला से ची प्रत मिळाली नसल्याचे कारण देत पुन्हा ॲड. कराड यांनी सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. आता गुरुवारी सुनावणी होईल, असे न्या. एस. व्ही. पावसकर यांनी जाहीर केले.उद्या पोलिस कोठडी संपणार मकोका लागल्यानंतर कराड याला २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.