मुंबई - विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. वंचित बहुजन आघडीच्या सत्ता संपादन रॅलीच्या कार्यकर्ता मेळाव्यातून 'वंचित'च्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. लोकं आठवलेंना उल्लू व जोकर म्हणतात मात्र तरीही त्यांना लाज वाटत नसल्याचा खोचक टोला पाटील यांनी लगावला.
वंचित आघाडीच्या वतीने राज्यभर सत्ता संपादन रॅलीचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे. मंगळवारी सोलापुरात आलेल्या ह्या रॅलीत बोलताना अण्णाराव पाटील म्हणाले की, फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन आठवले केंद्रात मंत्री झाले, त्यांना बाबासाहेबांच्या नावा वेतिरिक्त काहीच येत नाही. फक्त कविता म्हणत असतात, तेही संसद भवनात. त्यांना लोकं उल्लू आणि जोकर म्हणतात मात्र तरीही त्यांना लाज वाटत नाही, ही किती दुर्देवाची गोष्ट असल्याचे पाटील म्हणाले.
बाबासाहेब यांच्या नावात एवढी जादू आहे कि, आठवलेंसारखे लोकं केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री होतात. तर मग त्याच बाबासाहेबांच रक्त असलेले बाळासाहेब आंबेडकर हे का मंत्री होऊ शकत नाही. असा प्रश्न अण्णाराव पाटील यांनी उपस्थित केला. तसेच यावेळी त्यांनी भाजप व काँग्रेसवर सुद्धा जोरदार टीका केली.