शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
2
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
3
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
4
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
5
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
6
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
7
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
8
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
9
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
10
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
11
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
12
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
13
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?
14
दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडले; Midcap स्टॉक्स आपटले
15
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
16
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
17
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
18
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
19
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 
20
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 

वाळू तस्करांविरुध्द वडनगरीकरांचा उद्रेक

By admin | Published: November 17, 2016 12:10 AM

विना परवानगी होणारी वाळूची अवैध वाहतूक व त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाईपलाईनला पोहचलेला धोका पाहता तालुक्यातील वडनगरी ग्रामस्थांनी बुधवारी रात्री आठ वाजता एल्गार पुकारत नदी

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. १६ : विना परवानगी होणारी वाळूची अवैध वाहतूक व त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाईपलाईनला पोहचलेला धोका पाहता तालुक्यातील वडनगरी ग्रामस्थांनी बुधवारी रात्री आठ वाजता एल्गार पुकारत नदी पात्रातच वाळूचे तब्बल १६ डंपर अडविले. काही चालक व डंपरवरील मजूर ग्रामस्थांच्या अंगावर धावून आल्याने संतापात अख्खे गाव नदीपात्रात धावून आले. ग्रामस्थांच्या या उद्रेकामुळे डंपर चालकांनी मिळेल त्या रस्त्याने पळ काढला. यावेळी झालेल्या दगडफेकीत काही डंपरच्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान,डंपरची जाळपोळ झाल्याची अफवा पसरल्याने तहसीलदार व पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

वडनगरी शिवारातील गिरणा नदीपात्रातून वाळूचा अमर्याद उपसा होतो. दरराजे ४० ते ४५ डंपर येथून वाळूची वाहतूक करतात. विशेष म्हणजे या नदीपात्राचा एकदाही लिलाव झालेला नाही, त्यामुळे चोरट्या पध्दतीने व दादागिरीने येथून वाळूची उचल होते. जेसीबी व मजूरांच्या माध्यमातून वाळू उपसा होत असल्याने नदीपात्रात शंभर ते दीडशे फूट खोल खड्डे पडले आहेत.हळूहळू हा उपसा गाव व शेतकऱ्यांच्या पाईप लाईनपर्यंत पोहचत असल्याने सरपंच पती महेंद्र चौधरी, उपसरपंच जगदीश सोनवणे, पोलीस पाटील जितेंद्र पाटील,अनिल सोनवणे, सुदर्शन सोनवणे, शशिकांत सोनवणे, प्रवीण सोनवणे, हर्ष, सोनवणे, भगवान सोनवणे यांच्यासह संतप्त ग्रामस्थांनी नदीपात्र गाठून डंपर अडविले.

पोलीस बंदोबस्ततहसीलदार निकम यांनी जागेवरच चालक बोलावून सर्व १६ डंपर रात्रीच जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. त्यात ६ डंपर भरलेले तर १० रिकामे होते. मालक व चालक रात्री उशिरापर्यंत निष्पन्न झालेले नव्हते. वाळू तस्करांविरुध्द खुद्द तहसीलदार निकम यांनीच पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पकडण्यात आलेल्या डंपर असेएम.एच.१९ झेड ७७७४, एम.एच.१९ झेड ३९१७, एम.एच.१९ झेड ५५००, एम.एच.१९ झेड ४७९६, एम.एच.१९ झेड २०००, एम. एच.१९ बी.एम. ४४४३, एम.एच.१९ झेड ६१६१,एम.एच.१९ झेड ७७७४, एम.एच.१९ झेड ६६६९,एम.एच.१९ झेड ९९९२, एम.एच. १९ झेड ७७४७, एम.एच.१९ झेड २९६२,एम.एच.१९ -१३१६, एम.एच.१९ झेड ३९१९,एम.एच.४८-०२९१,आर.जे.१२ जे.ए.१८६३तहसीलदार व पोलिसांमुळे टळला अनर्थघटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार अमोल निकम यांनी तातडीने घटनास्थळ गाठले,त्यापाठोपाठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, सहायक निरीक्षक सागर शिंपी, जितेंद्र पाटील, प्रफुल्ल धांडे, शैलश चव्हाण, गिरीश पाटील, विजय दुसाने, राजेंद्र बोरसे, अरुण सोनार, तलाठी नन्नवरे दाखल झाले. तहसीलदार निकम यांनी ग्रामस्थांची समजूत घालून वाळू तस्करांची गय केली जाणार नाही,त्यांच्यावर कारवाई होणारच असे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांचा संताप निवळला. तरीही संभाव्य खबरदारीचा उपाय म्हणून नियंत्रण कक्षातून अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला होता.