शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

कर्नाटक, मुंबईच्या बॅलेस्टिक अहवालात तफावत

By admin | Published: February 02, 2016 3:55 AM

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कर्नाटकचे एम.एम. कलबुर्गी यांची हत्या दोन वेगवेगळ्या पिस्तुलांद्वारे करण्यात आल्याचे कर्नाटक

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कर्नाटकचे एम.एम. कलबुर्गी यांची हत्या दोन वेगवेगळ्या पिस्तुलांद्वारे करण्यात आल्याचे कर्नाटक फॉरेन्सिक लॅबने बॅलेस्टिक अहवालात म्हटले आहे; तर कलिना फॉरेन्सिक लॅबने या तिन्ही हत्या एकाच पिस्तूलद्वारे करण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सीबीआयने यासाठी स्कॉटलॅण्ड यार्डची मदत घेण्याचे ठरवल्याची माहिती सोमवारी सीबीआयने उच्च न्यायालयाला दिली.सोमवारच्या सुनावणीवेळी सीबीआयने कर्नाटक सीआयडीने बॅलेस्टिक अहवाल दिल्याची माहिती खंडपीठाला दिली; तसेच पानसरे हत्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथक (एसआयटी) आणि दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने खंडपीठापुढे तपास अहवाल सादर केला. ‘सीबीआय आणि एसआयटीने समाधानकारक तपास केला आहे. सध्या हा तपास अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे,’ असे खंडपीठाने म्हटले.या वेळी खंडपीठाने सीबीआयकडे दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी आणखी किती वेळ लागेल? अशी विचारणा केली. त्यावर सीबीआयने दोन महिन्यांची मुदत देण्याची विनंती खंडपीठाला केली. एवढा कालावधी लागण्याचे कारण खंडपीठाने विचारले असता सीबीआयचे वकील अनिल सिंग यांनी कर्नाटक आणि कलिना फॉरेन्सिक लॅबच्या बॅलेस्टिक अहवालात तफावत असल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणली. त्याचप्रमाणे या प्रकरणी स्कॉटलंड यार्डचे मत मागविल्याचे सांगत तपासासाठी दोन महिन्यांची मुदत अ‍ॅड. सिंग यांनी मागितली. मात्र दोन महिन्यांची मुदत जास्त कालावधी होत असल्याने खंडपीठाने सीबीआयला चार आठवड्यांची मुदत दिली.दरम्यान, स्मिता पानसरे आणि मुक्ता दाभोलकर यांचे वकील अभय नेवगी यांनी या प्रकरणातील संशयित आरोपी रुद्रगौडा पाटील गायब असल्याने आणि एनआयएने त्याला मडगाव बॉम्बस्फोटात आरोपी केल्याने एनआयएला प्रतिवादी बनवल्याची माहिती खंडपीठाला दिली. तर सीबीआयने या प्रकरणी आपण एनआयएच्या सतत संपर्कात असल्याची माहिती खंडपीठाला देताच अ‍ॅड. नेवगी यांनी एनआयएला प्रतिवादी बनवणार नाही, असे म्हटले.खंडपीठाने सीबीआय व एआयटीला पुढील अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे निर्देश देत या याचिकांवरील पुढील सुनावणी २६ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)