शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

पक्ष्यांपासून संरक्षित ज्वारीचे वाण विकसित

By admin | Published: October 24, 2015 4:29 AM

पक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात बुजगावणे उभारण्यापासून ते गोफण, फटाके वाजविण्याचे विविध प्रयोग शेतकरी करतात़ त्यानंतरही ज्वारी, बाजरीसारखी

- भाऊसाहेब येवले,  राहुरीराहुरी : पक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात बुजगावणे उभारण्यापासून ते गोफण, फटाके वाजविण्याचे विविध प्रयोग शेतकरी करतात़ त्यानंतरही ज्वारी, बाजरीसारखी पिके पक्ष्यांपासून वाचविण्यास अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. मात्र, आता शेतात दाणे भरत असताना पक्ष्यांना ज्वारी खाता येणार नाही, असे वाण विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.ज्वारी फुले पंचमी असे या सुधारित वाणाचे नाव असून, सध्या हा वाण लाह्या बनविण्यासाठी विकसित केला आहे़ मात्र, पक्ष्यांपासून होणारे नुकसान टाळता येत असल्यामुळे तो शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे़ होप प्रकल्पाअंतर्गत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ज्वारी सुधार प्रकल्पाने लाह्यांसाठी ‘फुले पंचमी’ हा सुधारित ज्वारी वाण विकसित केला आहे़ अहमदनगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील तीनशे शेतकऱ्यांच्या शेतात त्याचा यशस्वी प्रयोग राबविण्यात आला़ या ज्वारीचे दाणे भोंडात असल्याने पक्ष्यांना ते खाता येत नाहीत, असे वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ़ शरद गडाख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ डॉ़ गडाख म्हणाले, लाह्यांसाठी पूर्वी देशात विविध प्रकार नव्हते. मालदांडीपासून ५० टक्के लाह्या तयार होत असत़ त्यामुळे लाह्यांची ज्वारी तयार करण्याचा विचार पुढे आला़ ‘फुले पंचमी’ ज्वारीपासून ९७ टक्के लाह्या तयार होतात तर केवळ ३ टक्के हलग्या राहतात़ या ज्वारीला पक्ष्याने चोच मारल्यानंतर त्याच्या नाकाला टोचते़ त्यामुळे पक्षी कणसातील दाणे खात नाहीत़२० क्विंटलपेक्षा जास्त उत्पादनअन्य ज्वारीला १५ रूपये किलो भाव मिळतो़ मात्र या वाणाला २८ ते ३२ रूपये किलो याप्रमाणे भाव मिळतो़ हेक्टरी २० क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन मिळते़ अधिक उत्पादनासाठी योग्य वेळी पेरणी, बांधबंदिस्ती, आंतरमशागत या बाबी महत्त्वाच्या आहेत़ ‘फुले पंचमी’ वाण ११५ ते १२० दिवसांत काढणीस येतो़ हेक्टरी ४० ते ४५ क्ंिवटल कडब्याचे उत्पादन मिळते़ आॅक्टोबरअखेर ज्वारीची पेरणी केली जाते़तयार करण्याची पद्धती लाह्या तयार करण्यासाठी प्रथम ज्वारी स्वच्छ धुऊन घ्यावी़ किंवा ज्वारीवर दोन-तीन टक्के पाणी शिंपडून कापडामध्ये बांधून दहा-बारा तास दडपून ठेवावी़ त्यामुळे ज्वारीच्या आर्द्रतेचे प्रमाण वाढते़ नंतर शेगडीवर कढई ठेवून त्यामध्ये बारीक मीठ टाकून गरम करावे़ मीठ गरम झाले की त्यात ओलविलेली लाह्यांची ज्वारी टाकावी़ ती हलवत राहावी. लाह्या फुटणे बंद झाल्यावर लाह्या व मीठ वेगळे करावे़ लाह्यांच्या रव्यापासून वडी बनविली जाते़