वसई : वसई विकास सहकारी बँकेने सन २०२० पर्यंत पाच हजार कोटीचा व्यवसाय आणि ३० पर्यंत शाखा विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे, ही माहिती बँकेच्या संचालक मंडळाने रविवारी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.बॅकेने चालू वर्षात एकूण व्यवसायात १९.७ टक्के वाढ केली असून आर्थिक वर्षा अखेर एकूण व्यवसाय रू. २१३१.१२ कोटी झाला असल्याचे जाहीर केलेले आहे. २०११ साली बॅकेत कोअर बॅकिंग प्रणाली राबवण्यात आली असून बॅकेच्या १९ शाखा व मुख्य कार्यालय कोअर बॅकिंग प्रणालीद्वारे एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. ग्राहकांना आधुनिक सेवा प्रदान करण्यासाठी बॅक तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेत असून त्यासाठी बॅकेने नामांकित कंपनीचे सर्व्हर, राऊटर, स्वीच, फायरवॉल इत्यादींचा वापर करून स्वत:चे अद्यावत डेटा सेंटर उभारले असल्याची माहिती बॅकेचे विद्यमान चेअरमन हेमंत रमेश म्हात्रे यांनी दिली. लवकरच मोबाईल बॅकिंग, दस्ताऐवज व्यवस्थापन, ई-केवायसी, ई-लॉबी इ. उपक्रम लवकरच कार्यान्वित करणार असल्याचेही सांगण्यात आले. बँकेने ३१ जानेवारी २०१६ रोजी १२६८ कोटी ठेवी आणि ७५५ कोटींचे कर्ज वाटप करून २०२३ कोटींचा एकंदर व्यवसाय केला आहे. बँकेचा स्वनिधी व रिझर्व फंड १०३ कोटीच्या वर पोहचला आहे. आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप संत, सहा. महाव्यवस्थापक भास्कर राव,व्हा.चेअरमन जगदिश राऊत तसेच बॅकेच्या संचालक मंडळातील संचालक आशय राऊत, महेश म्हात्रे, केवल वर्तक, भालचंद्र कवळी, तनुजा राऊत, तृप्ती म्हात्रे व इतर संचालक व भागधारक सभासद होते.(प्रतिनिधी)>किरवली गावात या बॅकेची १९८४ मध्ये स्थापन झाली. तिने उत्तुंग भरारी घेतली आहे. नाशिक व औरंगाबाद येथे बँकेने नुकत्याच आपल्या शाखा सुरू केल्या असून तिला सहकार क्षेत्रातील अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.
वसई विकासचे ५ हजार कोटींचे व्यवसाय उद्दिष्ट
By admin | Published: September 19, 2016 3:14 AM