शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वसईत एसटी धावणारच; मंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2016 3:34 AM

वसई आणि नालासोपारा आगारातील शहरी वाहतूक बंद करण्याचा एसटीने घेतलेला निर्णय तूर्तास मागे घेतला आहे.

वसई : वसई आणि नालासोपारा आगारातील शहरी वाहतूक बंद करण्याचा एसटीने घेतलेला निर्णय तूर्तास मागे घेतला आहे. पालिकेच्या ठेकेदाराकडे पुरेशा बसेस नसल्याने पालिकेने ताबडतोबीने बस सुरु करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यातच परिवहन मंत्र्यांनी हस्तक्षेप करून बस सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तूर्तास शहरी बस वाहतूक सुरु राहणार आहे. लोकमतनेही प्रश्न लावून धरल्याने वसईत आंदोलनाची ठिणगी पडली होती. लांब पल्ल्यांच्या गाड्या बंद केल्यानंतर वसई आणि नालासोपारा आगारातील २५ मार्गावर शहरी बस वाहतूक २१ सप्टेंबरपासून बंद करण्याचा निर्णय राज्य परिवहन मंडळाने घेतला होता. तसे पत्र महामंडळाने वसई विरार पालिका आयुक्तांना देऊन यामार्गावर पालिकेच्या बसेस सुरु करण्यास सुचविले होते. तसेच शहरी बसेसचे विद्यार्थी आणि इतर पासेस देणेही एसटीने बंद केले होते. याप्रकरणी लोकमतने आवाज उठवल्यानंतर वसईत आंदोलन सुुरु झाले होते. या निर्णयामुळे हळुहळू लाल डबा वसईतून हद्दपार होऊन प्रवासी सेवेवर महापालिकेचे अतिक्रमण होण्याची भिती लक्षात घेवून जन आंदोलन समितीने आंदोलन छेडले होते. या आंदोलनाच्या निमित्ताने समितीने गावागावात बैठकी लावून जनजागरण केले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी नालासोपारा डेपोत एस.टी.बचाव आंदोलन करून आगार व्यवस्थापक भोसले यांना जाब विचारला. त्यावर एसटी बंद करणार नाही.असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेतले गेले. >२५ मार्गावर सेवा राहणार सुरू२१ सप्टेंबरपासून पालिकेने बस सेवा सुरु करावत यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पालिका आयुक्तांची भेट घेतली होती. मात्र, ठेकेदाराकडे पुरेशा बसेस नसल्याने तूर्तास बस सेवा सुुरु ठेवावी, अशी विनंती महापालिकेकडून करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी परिहवन मंत्री दिवाकर रावते यांचकडे शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर यांनी तक्रार केली होती. त्याची दखल घेत रावते यांनी गावकऱ्यांची इच्छा असेल तर बससेवा सुरु ठेवली जाईल, असा शब्द दिला. परिणामी एसटीने तूर्तास २५ शहरी बस वाहतूक सुुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी रावते संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती तेंडोलकर यांनी दिली. दुसरीकडे, एसटीने शहरी वाहतूक सुरु ठेवावी यासाठी जनआंदोलनाचा रेटा कायम ठेवला जाणार आहे.