शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

ती स्कॉर्पिओ वाझेने पार्क केली? वापरलेला कुर्ता मुलुंड टाेल नाक्याजवळ जाळल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 3:45 AM

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस सापडलेली स्कॉर्पिओ निलंबित एपीआय सचिन वाझेने पार्क केल्याचा संशय एनआयएला आहे. ...

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस सापडलेली स्कॉर्पिओ निलंबित एपीआय सचिन वाझेने पार्क केल्याचा संशय एनआयएला आहे. त्याबाबत एनआयएकडून त्यांची चौकशी सुरू आहे. (Vaze parked that Scorpio? Suspected burning of used kurta near Mulund toll Naka)अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्कॉर्पिओ ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांची होती. ही कार १७ फेब्रुवारीला चोरी झाल्याची तक्रार त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात केली. प्रत्यक्षात ही कारचोरी झालीच नव्हती असे स्पष्ट झाले. ती १७ फेब्रुवारीपासून हिरेन यांचे मित्र असलेल्या वाझेनी दडवून ठेवली. ही कार २५ फेब्रुवारीला वाझेनेच चालवत कार मायकल रोडपर्यंत आणली आणि आधीच ठरवून ठेवलेल्या ठिकाणी उभी केली. तेथून निसटण्यासाठी वाझेने इनोव्हा कारसोबत ठेवली होती. स्कॉर्पिओ ठरलेल्या ठिकाणी उभी केल्यानंतर वाझे या इनोव्हा कारमध्ये बसून निघून गेला. मात्र दोन तासांनी ताे पुन्हा या ठिकाणी आला. स्कॉर्पिओ न्याहाळून पुन्हा माघारी फिरला. यावेळी ओळख दडविण्यासाठी वापरलेला कुरता त्याने मुलुंड टाेल नाक्याजवळ जाळला, असा घटनाक्रम घडला असावा, असे एनआयएतील सूत्रांनी सांगितले. एनआयएने केलेल्या तपासातून त्यांनी स्फाेटक कारप्रकरणी बरेच तर्कवितर्क लावले आहेत. तसेच घडलेल्या घटनाक्रमाबाबत तपासाअंती एनआयएला जाे संशय आला आहे त्याबाबत खातरजमा सुरू असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात वापरलेली इनोव्हा कार वाझेच्या पथकाला शासकीय वापरासाठी देण्यात आली होती, असे तपासात समाेर आल्याचे समजते. ही कार पोलीस आयुक्तालयात उभी करण्यात आली. तसेच त्यावरील नंबर प्लेट बदलण्यात आली. पुढे ही कार मुंबई पोलिसांच्या एमटी विभागातून एनआयएने जप्त केली. 

एनआयए अधिकारी पोलीस आयुक्तालयात -राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्तालयात नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासह गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. नवीन आयुक्त असल्याने ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले. मात्र भेटीमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.

मालमत्तेबाबत ईडीकडून होऊ शकते चौकशीवाझेच्या मालमत्तेबाबत ईडीकडून चौकशी होऊ शकते अशी माहिती ईडीच्या सूंत्रानी  दिली. त्यामुळे वाझेच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेPoliceपोलिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाMukesh Ambaniमुकेश अंबानी