पालेभाज्यांची आवक घटल्याने आठवड्याच्या शेवटी मेथीसह सर्व भाज्यांचे भाव वधारले. औरंगाबादच्या जाधववाडी कृउबा येथील फळ, पालेभाज्यांच्या आडत बाजारात शनिवारी १५० टनापर्यंत फळभाज्या, पालेभाज्यांची आवक झाली. मध्यंतरीच्या काळात पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या, त्याचा परिणाम आता जाणवत आहे. आवक घटल्याने ठोकमध्ये २ ते ३ रुपये प्रति जुडी विक्री होणारी मेथी १० ते १५ रुपये जुडी विकली गेली.
मेथीच्या भावावर अन्य भाज्यांचे भाव ठरविले जातात. मेथी महागल्याने पालक, शेपू, चुका या भाज्यांचे भावही ३ रुपये वाढून ८ रुपये प्रतिजुडी विकली जात होती. आग्रा येथून ७० टन बटाट्याची आवक झाली. आवक घटल्याने ठोकमध्ये २०० रुपयांनी महागून बटाटा १५०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला. किरकोळ विक्रीत १५ ते २० रुपये किलोपर्यंत बटाटा विकला जात आहे.