पावसाने हुलकावणी दिल्याने बहुतांश भाज्या या विदर्भातील खडकपूर्णा धरणाजवळील नारायणखेड येथून येत आहेत़ फुलकोबी, पत्ताकोबी, सिमला मिरची, भेंडी, टोमॅटो, हिरवी मिरची, वांगे आदींची आवक बाजारपेठेत बऱ्यापैकी आहे़ घाऊक बाजारात फुलकोबी, पत्ताकोबी १५० ते १६० रुपयांना १० किलो, टोमॅटो १ कॅरेट १२० ते १३० रुपयांना विकले जात आहे़
भेंडीने मात्र या वेळेस भाव खाल्ला असून ३५ ते ४० रुपये किलो दराने घाऊक बाजारात भेंडी उपलब्ध आहे़ कोथिंबीर, हिरवी मिरचीलाही चांगली मागणी आहे़ किरकोळ बाजारपेठेत कोथिंबीर ५ रुपयांना एक जुडी, तर हिरवी मिरची २० रुपये किलो दराने विक्री होत आहे़ भाजीपाल्यासह सफरचंद, केळी, डाळिंब आदींचे भावही उपवासामुळे वाढले आहेत़ एकूण घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेतील दरांचा फटका शेतकरी, नागरिकांना बसत असल्याचे चित्र आहे़