शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आवक वाढूनही भाज्या महागच!

By admin | Published: June 07, 2017 5:57 AM

शेतकरी संपामुळे बंद असलेल्या राज्यातील बहुतांश बाजार समित्यांचे व्यवहार आता पूर्ववत झाले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी संपामुळे बंद असलेल्या राज्यातील बहुतांश बाजार समित्यांचे व्यवहार आता पूर्ववत झाले असून मुंबई बाजार समितीत मंगळवारी १३६१ ट्रक भाजीपाला, फळे व इतर शेतीमालाची आवक झाली. मात्र, तरीही महानगरात भाजीटंचाई कायम असल्याने हा भाजीपाला जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.बाजारातील आवक आणि जावक पूर्ववत झाली असताना येणारी फळं आणि भाजीपाला जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीमालाच्या हमीभावासाठी शेतकरी संपावर गेलेले असताना व्यापारी मात्र चढ्या भावाने भाज्या व फळांची विक्री करत असल्याचे दिसून येते. व्यापारी, पंचतारांकित हॉटेल्स आणि काही खासगी संस्थांनी शीतगृहांमध्ये भाजी व फळांची साठवणूक वाढवल्याने मुंबईत टंचाई निर्माण झाल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पोलीस बंदोबस्तात पश्चिम महाराष्ट्र व गुजरातहून दुधाचे टँकर्स मुंबईत येत असताना दुधाची टंचाई कायम आहे.संपाच्या सहाव्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक आक्रमक करत सरकारी कार्यालयांना टाळे ठोकले. त्यामुळे काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. दूध संकलन पूर्ववत सुरू झाले असले तरी भाज्यांचे दर गगनला भिडले आहेत. सोमवारचा बंद यशस्वी झाल्यानंतर मंगळवारी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयांकडे मोर्चा वळवला. अनेक ठिकाणी कार्यालयांना प्रतीकात्मक स्वरूपात टाळे ठोकले. कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, नाशिक आणि मराठवाड्यात संपाची तीव्रता कायम आहे. विदर्भात सर्व व्यवहार पूर्ववत झाले असून खान्देशातून आज मोठ्या प्रमाणात भाजीपाला मुंबईत आला. संपामुळे दूध-भाज्यांची आवक ठप्प होऊ नये म्हणून सातारा जिल्हा पोलिसांनी पुणे-बंगलोर महामार्गावर ४00 पोलीस तैनात केले आहेत.सोमवारपासून दूधपुरवठा सुरळीत झाला असून, भाजीपाल्याची आवकही वाढली आहे. मुंबई बाजार समितीत मंगळवारी १३६१ ट्रक भाजीपाला आला असल्याची माहिती मुख्य प्रशासक सतीश सोनी यांनी दिली.>मुंबई बाजार समितीतील आवकप्रकारएकूण ट्रकफळे३९१भाजीपाला४४२कांदा९१बटाटा५६लसूण१२मसाले११८धान्य२५१एकूण १३६१