ऑनलाइन लोकमत
औंढा नागनाथ (हिंगोली), दि. 5 - ख-या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा देवून फसवणूक करणाºया टोळीतील आरोपीचे नावच बनावट असल्याचे आढळले होते. तर आता या गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा क्रमांकही बनावट असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे या आंतरराज्य टोळीतील आरोपींना न्यायालयाने चौदा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
औंढा नागनाथ येथे १० लाखांच्या बदल्यात ३० लाखांच्या बनावट नोटा देणाºया टोळीस पोलिस कर्मचारी गजानन निर्मले यांच्या मध्यस्थीने सापळा रचून जेरबंद केले होते. यामध्ये तीन आरोपींना जागेवरच पकडले तर पडद्यामागील तीन आरोपी होते. यातील राजू उर्फ धर्मराज याने स्वत:चे नाव खोटे सांगून पोलिसांना चकवा दिला होता. या गुन्ह्यामध्ये एम.एच.२६ एएफ १३३९ या वाहनाचा वापर केला होता. ते पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या खºया मालकाचा तपास करीत असताना या वाहनाचा क्रमांकही बनावट असल्याचे आढळून आले. या वाहनाचा खरा क्रमांक एम.एच.२६ एन.६२८८ असा आहे. या गुन्ह्यातील आरोपी सैफखान जानखान, अनवरखान, गफूरखान, श्रीनिवास भोमपल्ली हे तिघे पोलिसांच्या जाळ्यात आहेत. खरे मास्टर मार्इंड असलेले राजू उर्फ धर्मराज, अॅन्थोनी, नसरूल्ला पठाण, देवकर हे अद्याप फरार आहेत. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत यातील आरोपी हे आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्टÑ अशा तीन राज्यातील असल्याने यांना जामीन दिल्यास ते पुन्हा सापडणार नाहीत, असे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने या आरोपींना चौदा दिवसाची पोलिस कोठडी दिली.गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस.के.केंद्रे, नाना पोले, चव्हाण, घोळवे, विशाल करीत असून पोलिस कोठडी मिळवण्यासाठी सरकारी अभियोक्ता अॅड. चेतन अग्रवाल यांनी परिश्रम घेतले.