शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

भुसावळ रेल्वेने स्थानकावर उभारला गांडूळ खत निर्मिती प्रकल्प; भविष्यात रेल्वेला मिळणार उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 8:51 AM

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील ‘अ’ श्रेणीतील भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने कचऱ्यावर प्रक्रिया करुन गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे.

ठळक मुद्दे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील ‘अ’ श्रेणीतील भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने कचऱ्यावर प्रक्रिया करुन गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे.रेल्वे स्थानकाच्या उत्तर भागात ऑईल डेपोला लागून गार्डनच्या जवळ हा प्रकल्प आकारास आला असल्याची माहिती भुसावळ रेल्वच्या अधिकृत सूत्रांनी दिली.भुसावळ रेल्वे स्थानक मध्य रेल्वेतील अत्यंत महत्त्वाचे स्थानक आहे. देशातील सर्वच दिशांना येथून रेल्वे प्रवासी गाड्या धावत असतात.

- पंढरीनाथ गवळीभुसावळ, दि. १६ - मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील ‘अ’ श्रेणीतील भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने कचऱ्यावर प्रक्रिया करुन गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. रेल्वे स्थानकाच्या उत्तर भागात ऑईल डेपोला लागून गार्डनच्या जवळ हा प्रकल्प आकारास आला असल्याची माहिती भुसावळ रेल्वच्या अधिकृत सूत्रांनी दिली. भुसावळ रेल्वे स्थानक मध्य रेल्वेतील अत्यंत महत्त्वाचे स्थानक आहे. देशातील सर्वच दिशांना येथून रेल्वे प्रवासी गाड्या धावत असतात.

१३५ प्रवासी गाड्या दिवसाला येथील रेल्वे स्थानकावरुन दिवसाला १३५ प्रव्रासी गाड्या धावत असतात. या स्थानकावरुन रोज ३५ हजार प्रवासी जा-ये करीत असतात. त्यामुळे या स्थानकावर प्रवाशांनी खाऊन टाकून दिलेले खाद्य पदार्थ व केळीची साल असा रोज गोळा होणारा कितीतरी टन कचºयाची विल्हेवाट लावणे अवघड असल्याने भुसावळचे डीआरएम आर.के.यादव आणि आरोग्य विभागाने स्थानकार गोळा होणाºया कचºयापासून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेऊन हा प्रकल्प आकारास आणला आहे. रेल्वे स्थानकावर कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती करणारा बहुदा हा प्रकल्प मध्य रेल्वेत पहिलाच असावा, असे सांगण्यात आले आहे.

मध्य रेल्वेत पहिला प्रकल्प...मध्य रेल्वेतील भुसावळ रेल्वे स्थानकावर उभा राहिलेला गांडूळ खत निर्मिती प्रकल्प हा बहुदा मध्य रेल्वेतील स्थानकावर पहिलाच प्रकल्प असावा, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. रेल्वे स्थानकावर पूर्वी ज्या ठिकाणी कचरा टाकला जात होता, त्याच ठिकाणी दहा टँक उभारण्यात आले आहेत. यात सहा मीटर आकाराचे व ३० लीटर क्षमतेचे टँक आहेत. सध्या हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर आहे. यात अजून आधुनिकता आणली जाणार आहे,असे सूत्रांनी सांगितले.

रेल्वे कॉलनीतील बागांसाठी खताचा वापर...भुसावळ रेल्वे स्थानकावरील गांडूळ खत निर्मिती प्रकल्पात तयार होणाऱ्या खताचा सध्या रेल्वे कॉलनीतील बागांमध्ये वापर केला जात आहे. प्रकल्प सुरू होऊन महिना झाला आहे. यात अजून बऱ्याच सुधारणा करायच्या आहेत, अशी माहिती या प्रकल्पासाठी झटणारे भुसावळ रेल्वे स्थानकाचे अधीक्षक आर.के.कुठार यांनी दिली. दिवसाला जो काही कचरा गोळा होतो त्यावर या प्रकल्पात प्रक्रिया होऊन गांडूळ खत निर्माण केले जात आहे. भविष्यात शेतीसाठी त्याचा वापर होऊन रेल्वे उत्पन्न मिळू शकेल.

भुसावळ रेल्वे स्थानकाचा प्रचंड विस्तार आहे. रोज शेकडो प्रवासी गाड्या येथून सर्वच दिशांना धावतात. रोज हजारो प्रवासी येथून जा - ये करतात केळीचा हा प्रांत आहे. उरलेले खाद्य पदार्थ आणि केळीच्या साली याचा मोठा कचरा होतो. त्यावर प्रक्रिया करुन गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आकारास आला आहे. भविष्यात याद्वारे रेल्वेला उत्पन्न मिळेल असे नियोजन आहे.- सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय, वाणिज्य व्यवस्थापक