Ajit Pawar slams Shinde Fadnavis Govt: "शिंदे-फडणवीस सरकारच्या दृष्टीने ही शरमेची बाब"; अजित पवारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 06:57 PM2022-07-25T18:57:34+5:302022-07-25T18:59:28+5:30

अजित पवारांनी विविध मुद्द्यांवरून सरकारवर केली टीका

very shameful for you slams Ajit Pawar to Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Government | Ajit Pawar slams Shinde Fadnavis Govt: "शिंदे-फडणवीस सरकारच्या दृष्टीने ही शरमेची बाब"; अजित पवारांचा हल्लाबोल

Ajit Pawar slams Shinde Fadnavis Govt: "शिंदे-फडणवीस सरकारच्या दृष्टीने ही शरमेची बाब"; अजित पवारांचा हल्लाबोल

googlenewsNext

Ajit Pawar slams Shinde Fadnavis Govt: महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आले. या सरकारचे अस्तित्व कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे. तशातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस जोडीवर सडकून टीका केली. "राज्यात दोन जणांचे मंत्रीमंडळ अस्तित्वात आलेले असताना मंत्रीमंडळ विस्तार केला जात नाही हा खरंतर राज्यातील तेरा कोटी जनतेचा अपमान आहे. तुम्हाला बहुमत आहे तर मंत्रीमंडळ अस्तित्वात आणा. आज शेतकरी त्रासून गेला आहे. अतिवृष्टी सुरू झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत ही या सरकारच्या दृष्टीने शरमेची बाब आहे" अशा शब्दांत अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

सध्या राजकीय घडामोडीमुळे राज्याचे अधिवेशन झाले नाही. आता मुख्यमंत्री दौरा काढणार आहेत. मात्र अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी लोकप्रतिनिधी फिरल्यानंतर आकडेवारी मांडण्याचे एकमेव साधन अधिवेशन आहे. तुमच्याकडे बहुमत आहे तर अधिवेशन का घेत नाही? असा सवाल त्यांनी केला. तसेच, राष्ट्रपतींचे मतदान सुरु असताना  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन राज्यातील जनतेला तातडीने दिलासा द्या आणि आलेल्या आपत्तीमध्ये लक्ष घाला असे आम्ही सांगितले होते आणि आजही ओला दुष्काळ जाहीर करुन तात्काळ अधिवेशन घ्या अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली.

"राज्यातील धरणाची पाणी परिस्थिती सुधारली आहे. धरणे तुडुंब भरली आहेत. काही ठिकाणी पाहणी केली असून आताही काही भागात जाणार आहे. निसर्गाचा प्रकोप झाला त्यावेळी SDRF चे नियम बाजुला ठेवुन मदत केली होती. परंतु आज निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जावं लागत आहे. जनता अडचणीत असताना मदत का करत नाही. प्रसंग आलाय तर तातडीने अधिवेशन बोलवा. तिरुपती बालाजी देवस्थानामध्ये प्रवेश नाकारल्याची घटना समोर आली आहे. याबाबत विश्वस्त मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला आहे. जनतेच्या मनात जो संभ्रम निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ संपर्क करावा व जी चर्चा सुरू आहे, त्याला पायबंद घालावा आणि वस्तुस्थिती समोर आणावी", असे अजित पवार म्हणाले.

"बांठिया आयोग नेमताना आम्ही सकारात्मक होतो. ग्रामविकास खाते, आमचे सर्व मंत्री यामध्ये काम करत होते. इम्पिरिकल डाटा गोळा करून दिल्याने सगळ्यांच्या प्रयत्नाने हे घडले आहे. मागणी सर्वांची होती. यामध्ये कोणताही वाद नव्हता याचे समाधान आहे. हवामान खात्याचे अंदाज सध्या चुकायला लागले आहेत. रेड अलर्ट देतात आणि पाऊसच पडत नाही मात्र शाळांना सुट्टी जाहीर होते. हवामान खात्यावर केंद्रसरकारने व राज्याने हवा तो खर्च करावा आणि सुधारणा करावी. हवामान खात्याने जाहीर केले की पाऊस पडतच नाही याबाबत सर्वत्र नाराजी आहे", असेही ते म्हणाले.

Web Title: very shameful for you slams Ajit Pawar to Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.