मुंबई : नेरळ-माथेरान मार्गावर चालविण्यात येणाऱ्या मिनी ट्रेनला ‘माथेरानची राणी’ नावाचे विस्टाडोम कोच (पारदर्शक काचा असलेली खिडकी) जोडला आहे. या कोचला प्रवाशांची वाढती पसंती लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने विस्टाडोम कोचसाठी रेल्वे बोर्डाकडे मागणी केली आहे. ती मंजूर होण्याची शक्यता असल्याने डेक्कन, मांडवी, पंचवटी, कोकण कन्या या मेल, एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांनाही प्रवासादरम्यान निसर्गाचे सौंदर्य पाहता येईल.कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाºया जनशताब्दी एक्स्प्रेसप्रमाणे डेक्कन, मांडवी, पंचवटी आणि कोकणकन्या एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच जोडला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. नेरळ-माथेरान विस्टाडोम कोचमुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. मुंबई ते मडगाव चालविण्यात येणाºया कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच जोडल्यास प्रवाशांना पारदर्शक खिडक्यांच्या काचांमुळे निसर्गाचे सौंदर्य पाहता येणार आहे. मुंबई ते पुणे या मार्गावर धावणाºया डेक्कन एक्स्प्रेसमधून सह्याद्रीच्या रांगांचे दर्शन घडणार आहे.प्रवाशांच्या सोयीनुसार होणार काही बदलपारदर्शक काचेच्या खिडक्या आणि छत असल्याने संपूर्ण परिसर पाहता येणार आहे. मात्र उन्हामुळे प्रवाशांना कोचमध्ये उकडायला होते. सूर्याच्या तेजस्वी प्रकाशामुळे छताकडे पाहता येत नाही, अशी तक्रार काही प्रवाशांनी केली. या तक्रारीची दखल घेत मेल, एक्स्प्रेसच्या विस्टाडोममध्ये काही बदल करून तो अद्ययावत करण्यात येईल.छतावरील काचेतून येणारी उष्णता कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू आहे. सूर्यप्रकाशाची फक्त ४० टक्के उष्णता कोचमध्ये येईल आणि प्रवाशांना उकडणार नाही, अशा प्रकारचे छत बनविले जात आहे. यासह कोचमधील एसीच्या (कूलिंगच्या) पद्धतीत बदल केले जाणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.
मांडवी, पंचवटी, डेक्कनलाही जोडणार विस्टाडोम कोच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 6:24 AM