ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनाच्या समस्येमुळे त्यांना शुक्रवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून दिलीप कुमार यांना अस्वस्थ वाटत होते, शुक्रवारी त्यांना जास्त त्रास व्हायला लागल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
'सध्या केलेल्या चाचण्यांनुसार त्यांना न्युमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना आणखी दोन दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येईल. काल त्यांना ताप आला होता, थोडी उलटीही झाली. त्यांच्या छातीतही संसर्ग झाल्याची शक्यता आहे. पुढील ७२ तास दिलीपकुमार यांच्यासाठी अतिशय महत्वाचे असून त्यांच्या प्रकृतीत सुधारण न झाल्यास त्यांना आयसीयूमध्ये हलवावे लागेल' अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली.
Dilip Kumar ji was admitted to Lilavati hospital at 2AM for respiratory problems,he's not in ICU:Dr. Jalil Parkar (Lilavati Hospital) to ANI— ANI (@ANI_news) April 16, 2016
Doctors are keeping a close watch on him (Actor Dilip Kumar)- Dr. Jalil Parkar (Lilavati Hospital) to ANI— ANI (@ANI_news) April 16, 2016
He had fever yesterday, vomiting too. Maybe his(Dilip Kumar) chest is infected: Dr. Jalil Parkar (Lilavati Hospital) pic.twitter.com/wSDtolckQ4— ANI (@ANI_news) April 16, 2016