शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन

By admin | Published: December 24, 2016 4:55 AM

ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार वामन होवाळ यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार वामन होवाळ यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी, स्नुषा, जावई असा परिवार आहे.मूळचे सांगलीचे असलेले वामन होवाळ यांनी उच्च शिक्षण मुंबईत घेतले. दलित ग्रामीण विश्वाचे प्रत्यंकारी चित्रण त्यांनी रेखाटले. कधी कोपरखळ्या मारत, प्रसंगी चिमटे काढत वास्तव मांडणारे हे लेखन वाचकाला अंतर्मुख करणारे होते. मुंबईतल्या झोपडपट्टीतील वास्तव त्यांनी प्रखरतेने मांडले. कथालक्ष्मीच्या अंकात प्रसिद्ध झालेली त्यांची माणूस (१९५३) ही पहिली कथा विशेष गाजली. शिवाय बेनवाड, येळकोट, वारसदार हे त्यांचे कथासंग्रहदेखील गाजले. आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात, जपून पेरा बेणं या लोकनाट्याने रसिकांच्या मनात त्यांनी अढळ स्थान निर्माण केले. त्यांनी कथाकथनाचे कार्यक्रमही केले. आपल्या खास शैलीत ते कथा सांगू लागले की, प्रेक्षक त्यात रंगून जात असत. शंकर पाटील, द. मा. मिरासदार, माडगुळकर यांच्या नंतरच्या पिढीतील कथाकथनकार अशी त्यांची ओळख होती. वामन होवाळ यांच्या मजल्याचं घर, पाऊसपाणी या कथांचे इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत अनुवाद झाले असून आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.(प्रतिनिधी)हरहुन्नरी माणूस हरपलासाहित्य विश्वाचा आढावा घेणारे, विशेष म्हणजे तरुण पिढी काय लिखाण करते याकडे बारकाईने लक्ष देणारे वामन होवाळ होते. आमची जुनी मैत्री होती. राहायला देखील जवळ असल्याने आमची भेट ही नित्याचीच होती. शुक्रवारी दुपारी ३ वाजता झालेल्या भेटीत त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा झाली. रुग्णालयात जात असतानाच त्यांचे निधन झाले. दहा-बारा वर्षांपूर्वी त्यांची बायपास सर्जरी झालेली होती. आंबेडकरी साहित्य चळवळीबद्दल ते नेहमी सकारात्मक भुमिका मांडायचे. बोधी नाट्य परिषदेत देखील त्यांनी उपस्थिती लावली होती. जुन्या काळात वग, लोकनाट्यांचे लिखाण, सदाशिव अमरापूरकर यांच्या चित्रपटात त्यांनी पोलिसाची भुमिका केली होती. एकंदरीत वामन होवाळ यांच्या निधनाने साहित्य विश्वातील हरहुन्नरी माणूस हरपला.- प्रेमांनद गज्वी, ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार