नाशिक : देशातील हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येवर उपायासाठी तसेच हिंदूरक्षणासाठी विश्व हिंदू परिषद लवकरच ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करणार आहे. विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शन मंडळाची बैठक ५ सप्टेंबरला त्र्यंबकेश्वरच्या जुन्या आखाड्यात होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मुस्लिमांची लोकसंख्या ६ टक्के होती, ती आता १५ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे, तर याउलट हिंदूंची लोकसंख्या ८७ टक्क्यांवरून ८० टक्क्यांवर आली आहे, असा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)
हिंदूरक्षणासाठी विहिंपचा ‘अॅक्शन प्लॅन’ - तोगडिया
By admin | Published: August 29, 2015 1:24 AM