शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

शासनाच्या तिजोरीत एसटीचे आठ हजार कोटी, सर्वाधिक प्रवासी कर महाराष्ट्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 4:54 AM

शासनाची तिजोरी फुगविण्यात एसटीचा मोठा हातभार राहिला आहे. विविध करांच्या रूपात महामंडळाने मागील १० वर्षांत आठ हजार २४५ कोटी २९ लाख रुपये शासनाला दिले आहेत.

- विलास गावंडेयवतमाळ : शासनाची तिजोरी फुगविण्यात एसटीचा मोठा हातभार राहिला आहे. विविध करांच्या रूपात महामंडळाने मागील १० वर्षांत आठ हजार २४५ कोटी २९ लाख रुपये शासनाला दिले आहेत. यात सर्वाधिक रक्कम प्रवासी कराची , तर टोल टॅक्सचा दुसरा क्रमांक लागतो. काही टोल नाके बंद झाले असले तरी, कराचा आलेख खाली आलेला नाही. अडचणीत आलेल्या ‘लालपरी’ला आता शासनाकडून मदतीची आस आहे.राज्यातील १२ कोटी जनतेला सेवा देत असलेली एसटी गावागावात पोहोचली आहे. १८ हजार ५०० बसेसच्या माध्यमातून आणि एक लाख पाच हजार कामगारांच्या भरवशावर लोकवाहिनीचा प्रवास सुरू आहे. खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढत प्रवाशांना सेवा देणारी ‘एसटी’ शासनाच्या तिजोरीचेही शेड्यूल सांभाळत आहे. शिवाय शासनामार्फत राबविल्या जाणाºया योजनांचाही भार उचलत आहे. याची उधारी देण्यात शासन हात आखडता घेत आहे. पण एसटी आपले देणे चुकत नाही. कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न आहे. नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत आहेत. बसस्थानकांची दयनीय अवस्था आहे. यासह इतर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे. कराचा बोजा हलका केला तरी एसटी ला सुगीचे दिवस येतील, असेही सांगितले जात आहे.आर्थिक वर्ष २००६-०७ ते २०१५-१६ या दहा वर्षांच्या कालावधीत विविध कराच्या रुपात ‘एसटी’ने राज्य शासनाला आठ हजार २४५ कोटी २९ लाख रुपये दिले आहेत. यात प्रवासी कर सात हजार तीन कोटी ७६ लाख रुपये आहे. विशेष म्हणजे इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक १७.०५ टक्के प्रवासी कर आकारला जातो. सुविधांच्या नावाने मात्र बोंबाबोंब आहे. फाटलेल्या आणि तुटलेल्या सीट्सवरून प्रवास करताना प्रवाशांना अनेक यातना सहन कराव्या लागतात. शासनाची कुठलीही मदत मिळत नसल्याने एसटीची ही हालत असल्याची ओरड आहे.खरेदी केलेल्या नवीन एसटीवर शासनाला दहा वर्षात ७७ कोटी चार लाख रुपयांचा कर देण्यात आलेल्या आहे. टोल टॅक्स ९२१ कोटी ४२ लाख रुपये दिला आहे. भांडवली व्याजाच्या स्वरूपात सहा वर्षात २४३ कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत पडले.एसटी महामंडळाकडून कराच्या रुपाने शासनाला मिळणाºया रकमेचा आकडा दरवर्षी फुगत गेला आहे.तरीही शासनाचाच उपक्रम असलेल्या एसटीला मदतीचा हात देण्यात शासनाचा मात्र असहकार दिसत आहे.शासनाला मिळालेली रक्कम (कोटीत)सन २००६-०७ रुपये ५८९.५२ कोटी, २००७-०८ रुपये ६४२.८५, २००८-०९ रुपये ६९६.०९, २००९-१० रुपये ६९०.९१, २०१०-११ रुपये ७६३.७४, २०११-१२ रुपये ८६२.६१, २०१२-१३ रुपये ८९८.४७, २०१३-१४ रुपये ९९२.८७, २०१४-१५ रुपये १०७३.२३, २०१५-१६ रुपये १०३४.१९ कोटी.

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार