डहाणू : तालुक्यात मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण, शहर तसेच नदी, नाले भरून सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाल्याने चार जण पुरात वाहून गेले. तर पावसाच्या भीतीने घरात शिरलेल्या सापाने झोपलेल्या एका महिलेचा बळी घेऊन दोन वेगवेगळ्या घटनांत एकाच दिवशी पाच जणांना जीव गमवावा लागला. दरम्यान, सततच्या पावसामुळे विविध कारणांमुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्याने डहाणू, गंजाड, चारोटी, कासा, चिंचणी, वाणगाव येथे पूरस्थिती निर्माण होऊन शेती, मासेमारी, तसेच इतर कामानिमित्त बाहेर पडलेल्या चार जण पुरात वाहून गेले. त्यांचे मृतदेह बुधवारी मिळाले असून पोलिसांनी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. पार्वती लक्ष्मण कटिला (३८) रा. आगवन डहाणू, जयेश मासमार (२६) रा. सोगवे डहाणू, विष्णू अर्जुन जहला (२६) रा. आगवन डहाण, गणपत बारक्या सुतार रा. वानगाव इ. पुरात वाहून गेले असून पार्वती दशरथ डोंगरे रा. गजाड ही महिला घरात झोपलेली असताना शिरलेल्या सापाने तिला दंश केला.(वार्ताहर)
डहाणूत पावसाने घेतला चौघांचा बळी
By admin | Published: August 04, 2016 2:33 AM