शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

बळीराजाच्या संतापाचा उद्रेक!

By admin | Published: June 02, 2017 4:20 AM

विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकरी आंदोलनाला पहिल्याच दिवशी हिंसक वळण लागले. आंदोलकांना पांगविण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकरी आंदोलनाला पहिल्याच दिवशी हिंसक वळण लागले. आंदोलकांना पांगविण्यासाठी येवल्यात पोलिसांना गोळीबार करावा लागला. तर औरंगाबादेत व्यापाऱ्यांनी शेतकरी नेत्याला मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला. आंदोलकांनी शहरांकडे जाणारा भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला, तर हजारो लीटर दूध रस्त्यांवर ओतले. या आंदोलनाचे लोण मुंबई वगळता संपूर्ण राज्यात पोहोचल्याने उद्यापासून भाजीपाला व दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरीही संपात सहभागी झाल्याने बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाले. रस्तोरस्ती भाजीपाल्याचे ढीग दिसत होते आणि दुधाचे पाट वाहत होते.नाशिक जिल्ह्यामध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले. शेतमालाची वाहतूक करणारी वाहने अडवून त्यातील माल रस्त्यावर फेकण्यात आल्याने पोलिसांना काही ठिकाणी लाठीमार करावा लागला. त्यामुळे निफाड, नैताळे, लासलगाव, येवला आदी गावांमध्ये तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर नैताळे रामपूर, गाजरवाडी, सोनेवाडी, श्रीरामनगर येथील शेतकऱ्यांनी सकाळी ८ वाजता डाळिंबी, कांदे, आंबे, बटाटे रस्त्यावर फेकून सरकारविरोधात संताप व्यक्त केला. जमाव नियंत्रणाबाहेर असल्याने राज्य राखीव दलास पाचारण करण्यात आले. शेतकऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी लाठीमार करण्यात आला. त्यास प्रत्युत्तर म्हणून शेतकऱ्यांनीही पोलिसांवर तुफान दगडफेक केली. नाशिक, मुंबई व गुजरातकडे जाणारा शेतमाल पूर्णत: बंद केला आहे. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना मोफत दूध देऊन आंदोलकांनी ‘गांधीगिरी’ केली़ संपकरी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यांवर ओतल्याने रस्त्यावर दुधाचे पाट वाहत होते. विदर्भातही तीव्र पडसादशेतकऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचे पडसाद अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात उमटले असून अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर गुरूवारी दुपारी २ वाजता कांदे, भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.काय आहेत मागण्याशेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा आणि शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, या मागण्यांसाठी किसान क्रांती समन्वय समितीने १ जूनपासून शेतकरी संपाची हाक दिली होती. तशी घोषणा बुधवारी पुणतांबा (जि. अहमदनगर) येथे केली होती. नगर, नाशिक, औरंगाबादेतून सुरू झालेल्या या आंदोलनाला बघताबघता राज्यव्यापी स्वरुप प्राप्त झाले.पुणे मार्केट यार्डात आवक घटलीशेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पुणे येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे गुरुवारी भाजीपाल्याची आवक ४० टक्क्यांनी घटली. त्यामुळे टोमॅटो, भुईमूग, हिरवी मिरची वगळता इतर सर्व फळभाजी व पालेभाज्यांच्या दरात १० ते ३० टक्के वाढ झाली. शुक्रवारपासून भाजीपाल्याची आवक आणखी घटणार असल्याने भाजीपाल्याचे दर भडकतील, अशी शक्यता यार्डातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आडते असोसिएशनने शेतकऱ्यांच्या संंपाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मार्केट यार्डात सकाळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.जिल्हा बँकेच्या कर्ज शाखेला कुलूप अमळनेर येथे रास्ता रोको करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेच्या कर्ज शाखेत जाऊन तिथे कुलूप ठोकले. पीक कर्ज मिळत नसल्याने हे कुलूप लावण्यात आल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.