लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : खारेगाव टोल नाका ते वडपा या रस्त्यावर दुचाकी खड्ड्यात जाऊन झालेल्या अपघातात एकीचा मृत्यू झाला. उल्हासनगरहून रश्मी रोहेरा, करुणा व सोनी भटिजा या तिघी ठाण्याला बुधवारी सकाळी दुचाकीवरून नोकरीसाठी जात होत्या. मुंबई-नाशिक महामार्गावरील हायवे-दिवा येथे त्यांच्या दुचाकीला गाडीने ओव्हरटेक केले. तेव्हा बचाव करताना त्यांची दुचाकी खड्ड्यात जाऊन तिघी रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली जाऊन रश्मीचा मृत्यू झाला. या अपघातात सोनी भटिजा गंभीर जखमी असून, करुणा भटिजा किरकोळ जखमी झाली आहे. या दोघींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खड्ड्याने घेतला तरुणीचा बळी
By admin | Published: July 06, 2017 4:33 AM