आॅनलाइन लोकमत सोलापूरविजयपूर/ सोलापूर दि ६ : सायबण्णा शरणप्पा दलित युवकाशी विवाह केल्याच्या कारणावरून गर्भवती असलेल्या मुस्लीम युवतीला तिच्या कुटुंबीयांनी जीवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना विजयपूर जिल्ह?ातील गुंडकनाळ येथे घडली आहे. शनिवार दि. ३ जून रोजी घडलेली ही घटना मंगळवारी सकाळी उशिरा उघडकीस आली आहे. या घटनेमुळे विजयपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील गुंडकनाळ येथील रहिवासी बानू बेगम (वय २१) आणि सायबण्णा शरणप्पा (वय २४) यांचे परस्परांवर प्रेम होते. मात्र, याविषयीचा सुगावा त्यांनी कुटुंबीयांना लागू दिला नव्हता. जानेवारी त्यांच्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागल्यानंतर मोठया प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. त्यांच्या विवाहाला दोन्ही कुटुंबीयांचा विरोध होता.२३ जानेवारी रोजी दोन्ही कुटुंबीयांमध्ये जोरदार भांडण झाले होते. सायबण्णा आणि बानू बेगम यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. शिवाय, त्याच दिवशी पोलीस स्थानकात जाऊन बेगमच्या कुटुंबीयांनी सायबण्णाविरुद्ध पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. तसेच आपली मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगून तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २४ जानेवारी रोजी बानू आणि सायबण्णा हे दोघे पळून गेले. ते कोठे आहेत याचा थांगपत्ता कोणाला लागला नाही. गोव्याला गेलेले हे प्रेमी युगुल तेथील रजिस्टर (विवाह नोंदणी कार्यालय) आॅफिसमध्ये विवाहबद्ध झाले. भाडोत्री खोली घेऊन त्यांनी संसार थाटला.सहा महिन्यानंतर बानू गर्भवती झाली. तेव्हा पाच महिन्याची गर्भवती असल्याचे कुटुंबीयांना समजल्यास त्यांचे मनपरिवर्तन होईल, आपल्या विवाहाला दोन्ही कुटुंबीय संमती देतील, अशा समजुतीने ते दोघे आपल्या गावी गुंडकनाळ येथे परतले. मात्र झाले उलट. बानूच्या कुटुंबीयांनी सायबण्णाला सोडून देण्याची ताकिद दिली. मात्र, बानूने नकार दिला. त्यानंतर दोन्ही कुटुंबामध्ये जोरदार खडाजंगी झाली. किरकोळ हाणामारी झाली. त्या दिवशी सायंकाळी बानूच्या कुटुंबीयांनी सायबण्णाला जबर मारहाण केली. त्यामुळे जखमी अवस्थेत स्वत:चा बचाव करून घेण्यासाठी सायबण्णा पोलीस स्थानकाच्या दिशेने पळत सुटला. तिकडे बानूलाही मारहाण करून पेटवून दिले. सायबण्णा पोलीस स्थानकात पोहोचल्यानंतर १० मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत पूर्णपणे भाजलेली बानू जागीच गतप्राण झाली. तिला आगीतून वाचविण्याच्या प्रयत्नात सायबण्णा भाजल्याने आणखी जखमी झाला,पोलिसांनी सायबण्णा शरणप्पा ताब्यात घेतल्यानंतर त्याला आपल्या ताब्यात देण्याची मागणी बानूच्या संतप्त पालकांनी केली. मात्र, सायबण्णा शरणप्पा पोलीस जीपमधून नेत असताना संपूर्ण जमावाने पोलिसांच्या गोटात शिरून जबर मारहाण केली. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पोलिसांनी आरडाओरड केले यामुळे वातावरण आणखी तापले. रस्त्याशेजारी पार्किंग करण्यात आलेली पोलिसांची कार आणि दुचाकी पेटवून दिल्या. शेवटी पालकांशी समझोता करण्याचा पोलिसांचा प्रयत्न विफल ठरला. उभयतांत शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे भडकलेल्या पालकांनी पुन्हा दगडफेक केली. यात अनेक पोलीस जखमी झाले. दगडफेक करणा?या दोघांना यावेळी ताब्यात घेण्यात आले. अशी माहिती ताळीकोटचे डीवायएसपी पी. के. पाटील यांनी दिली.--------------------------------गुंडकनाळ येथे चोख बंदोबस्तगुंडकनाळ परिसरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. संवेदनशील भागात पोलीस दिवसभर गस्त घालत होते. त्यामुळे गुंडकनाळ मधील सर्व गल्ल्यांमध्ये सन्नाटा पसरला होता. नागरिकही कमी संख्येनेच घराबाहेर पडलेले दिसून आले. परिस्थिती निवळल्यानंतर गुंडकनाळ परिसरात केएसआरपी जवानांच्या २ तुकडी आणि ५० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. घटनास्थळी धाव घेऊन पोलीस अधीक्षक जैन यांनी परिस्थितीची पाहणी केली.
आॅनर किलींगच्या घटनेने विजयपूर हादरले, मुस्लीम युवतीला घरच्यांनी जिवंत जाळले
By admin | Published: June 06, 2017 2:25 PM