योगेश पांडे नागपूर : गुजरातमध्ये भाजपा पुन्हा सत्तेवर आला असला तरी जागांच्या शंभरीचा आकडा गाठताना पक्षाची दमछाक झाली. मतदानचा टक्का घसरल्यामुळे भाजपला बहुमत मिळेल; मात्र जागा घटतील, असा निष्कर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गत सर्व्हेक्षणातून समोर आला होता.गुजरातला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यात संघाची मौलिक भूमिका राहिलेली आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळी संघ स्वयंसेवकांनी सक्रियपणे प्रचार केला होता व त्यांचे निकाल जगाने पाहिले होते.गुजरातमध्येदेखील मतदानाचा टक्का वाढावा व भाजपासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी संघ परिवाराच्या विविध संस्थांना पदाधिका-यांचे मार्गदर्शन लाभत होते. संघ परिवाराशी जुळलेल्या कुटुंबातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे यासाठी स्वयंसेवक व प्रचारक कामाला लागले होते. स्वयंसेवकांनी भाजपाचे नाव घेऊन प्रचार न करता तरुणांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला व ‘हर घर, एक व्होट’ ही मोहीमच राबविण्यात आली. संघाच्या वरिष्ठ पातळीहून यासाठी विशेष नियोजनदेखील करण्यात आले होते.भाजपच्या पदाधिकाºयांनी सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला पाहिजे, अशी सूचनादेखील संघाच्या पदाधिकाºयांनी मागील वर्षीच केली होती.एकीकडे स्वयंसेवक मतदानवाढीसाठी प्रयत्न करत असताना संघाने अंतर्गत सर्वेक्षणदेखील केले होते.भाजप आमदारांचा आनंदोत्सवगुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला विजय हा जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेल्या विश्वासामुळेच मिळाला आहे. देशातील जनता भाजपासोबत असून पंतप्रधानांचे विकासकारण देशाला पुढे घेऊन जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
भाजपाचा विजय अन् संघाचे गणित, जागा घटण्याचे केले होते भाकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 3:04 AM