अकोला : विदर्भातील शेतकरी पारंपरिक पिकांसह कमी खर्चात भरघोस उत्पादन घेण्याकडे वळण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांनी विविध अभिनव प्रयोग सुरू केले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेही या पृष्ठभूमीवर नवे प्रयोग सुरू केले असून, प्रथमच फणस बीजोत्पादन सुरू केले आहे. या माध्यमातून विदर्भात फणस उत्पादनावर भर दिला जात आहे.विदर्भात धान, कापूस, सोयाबीन, तूर, मूग उडीद, ज्वारी आदी पिके मुख्यत्वे घेतली जातात; परंतु अलिकडच्या चार,पाच वर्षात शेतकरी या पारंपरिक पिकांसह शेतावर विविध प्रयोग करीत असून, भाजीपाला, फळे आदींसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू न पीके घेत आहे. उतीसंवर्धीत फळावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. भाजीपाला पिकात बाजारातील मागणी बघून उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. फणस हे उत्तम कोरडवाहू पीक असून, या पिकाला आर्द्रता लागते. कमी पाण्यात येणाऱ्या फणसाची बाजारात मागणी वाढतच आहे. फणसात अनेक प्रकारची खनीजं आहेत. भाजीसाठी कच्चे फणस उत्तम असून, पीकलेल्या फणसापासून गर मिळतो. फणसाचे दर बाजारात ६० ते ८० रू पये प्रतिकिलो असून, या पिकाच्या उत्पादनासाठी खर्चही कमी आहे. फणस बहुगुणी असून, फणसाचे खोड टणक आहे. फणसाच्या लाकडाचा वापर मोठ्या इमारत बांधकामात केला जातो.
विदर्भात फणस उत्पादनावर भर !
By admin | Published: March 03, 2016 3:53 AM