योगेश पांडे, नागपूरवेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीची हाक संपूर्ण देशात जावी, यासाठी १ मे रोजी विदर्भवादी संघटनांतर्फे सर्व ११ जिल्ह्यांतील मुख्यालयी विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येणार असून महाराष्ट्र दिनी संपूर्ण विदर्भात काळा दिवस पाळण्यात येणार आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे हे स्वत: नागपूरात विदर्भाचा झेंडा फडकविणार आहेत.१ मे १९६० रोजी विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला अन् त्यानंतर शासनाने नागपूर कराराचे पालनच केलेले नाही. विदर्भाकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. वेगळ्या विदर्भाची भूमिका घराघरामध्ये जावी व नागरिकांचे जास्तीतजास्त समर्थन मिळावेयासाठी विदर्भवादी संघटनांकडून१ मे रोजी काळा दिवस पाळण्यात येणार आहे, अशी माहिती अशी माहिती ‘विदर्भ कनेक्ट’चे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ यांनी दिली. राज्याचे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्र दिनी फडकवणार विदर्भाचा झेंडा
By admin | Published: April 19, 2016 4:16 AM