पुणे : राज्यात मॉन्सून सक्रीय असल्याने सर्वदूर पाऊस पडत आहे. विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असून, तेथील नद्यांना पूर आले आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही जोरदार पाऊस पडत आहे; मात्र मराठवाड्यात पाऊस कमी झाला.गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. महाबळेश्वर आणि चिखलदरा येथे सर्वाधिक ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ कुडाळमध्ये ७०, सावंतवाडी, वेंगुर्ला, गगनबावडा, धारणी येथे ६०, चिपळूण, अकोट, जळगाव जामोद येथे ५०, पोलादपूर, गडहिंग्लज, रावेर, भोकरदन, सिल्लोड, सोएगाव, बुलडाणा, संग्रामपूर, सिंदखेडराजा, वाशीम येथे ४०, गुहाघर, कणकवली, कर्जत, माथेरान, राजापूर, संगमेश्वर, भडगाव, चंदगड, चोपडा, एरंडोल, मुक्ताईनगर, एलदाबाद, पाचोरा, पारोळा, यावल, जाफराबाद, मालेगाव, मंगरूळपीर, मूर्तिजापूर, नांदुरा, पातूर, वाशिम येथे ३०, दापोली, देवगड, हर्णे, महाड, मालवण, मुंबई, श्रीवर्धन, पाली, तलासरी, अमळनेर, पुणे-भोर-जुन्नर, चाळीसगाव, इगतपुरी, जळगाव, जामनेर, पाटण, शाहूवाडी, शिरपूर, अंबड, हिंगोली, जालना, कळमनुरी, कन्नड, माहूर, सेनगाव, अंजनगाव, आष्टी, बाळापूर, बार्शी, टाकळ, भामरागड, चांदूर, दर्यापूर, देऊळगाव, गोंदिया, खामगाव, लोणार, मलकापूर येथे २०, अंबरनाथ, भिवंडी, हडाणू, जव्हार, कल्याण, खालापूर, पालघर, पनवेल, रत्नागिरी, रोहा, शहापूर, ठाणे, अहमदनगर, आजरा, गारगोटी, हरसूल, कळवण, कोल्हापूर, मालेगाव, राधानगरी, साक्री, सटाणा, वाई, औरंगाबाद, पैठण, फुलंब्री, अकोला, अमरावती, चंद्रपूर, चांदूर, धामणगाव, गडचिरोली, कळंब, कुरखेडा, पोंभुर्णा, शेगाव, वणी, यवतमाळ येथे १० मिमी पाऊस पडला. घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस आहे. गेल्या २४ तासांत कोयना घाटात १००, शिरगाव घाटात ८०, ताम्हिणी घाटात ७०, डुंगरवाडी घाटात ६०, खंद घाटात ५०, दावडी, भिरा घाटात ४० मिमी पाऊस पडला.नऊ ठिकाणीकृत्रिम पाऊस मुंबई : कृत्रिम पावसासाठी सी डॉपलर रडार गुरुवारी सकाळी ९.३० मिनिटांनी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे पोहोचले आणि ते बसविण्याची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हवामान शास्त्रज्ञांच्या व तंत्रज्ञांच्या सूचनेनंतरच ४-५ आॅगस्ट रोजी प्रत्यक्ष ढगांच्या उपलब्धतेनुसार व आर्द्रतेनुसार आकाशात क्लाऊड सिडींग करण्यात आल्याची माहिती प्रकल्प प्रमुख सुहास दिवसे यांनी दिली.
विदर्भात पावसामुळे जनजीवन विस्कळीत
By admin | Published: August 07, 2015 1:09 AM