आर्णी (यवतमाळ) : लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाभडी गावाचाही कायापालट करण्याची ग्वाही दिली होती. परंतु दोन वर्षांनंतरही गावाचा विकास झालेला नाही. येथील समस्या ‘जैसे थे’ आहेत. निवडणुकीदरम्यान मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी (जि. यवतमाळ) गावाला भेट दिली होती. तुमचा सर्वांगीण विकास करू, असे सांगितले गेले होते. दरम्यान १३ मार्च २०१५ रोजी चंद्रपूर-आर्णीचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी महाराष्ट्र शासन दाभडी गाव दत्तक घेणार असल्याचे जाहीर केले होते. यवतमाळचे भाजपा आमदार मदन येरावार यांनी दाभडीचे तत्कालीन सरपंच संतोष टाके यांना विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या आराखडा तयार करून त्याचे पुढे काहीच झाले नाही.
मोदींच्या ‘चाय पे चर्चा’मधील विदर्भातील गाव उपेक्षितच!
By admin | Published: June 02, 2016 2:37 AM