पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होत असतानाच विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे़ राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४५़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़कोकणातील काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात राज्यात जामखंडी, जुन्नर ३७, उस्मानाबाद १८़४, कोल्हापूर ९़५, औरंगाबाद २़४, महाबळेश्वर १़१, पुणे ०़८, सांगली २़४, सातारा १़६, तासगाव १७, सोलापूर०़८, पोलादपूर २५ आणि पणजी ०़८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़देशात प्रामुख्याने पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ आणि गुजरातचा किनारपट्टीचा भाग या परिसरात उष्णतेची लाट आली आहे़ तर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणीपूर, मिझोराम, त्रिपुरा, केरळ आणि रायलसिमा या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुढील दोन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागने दिला आहे़अवकाळीने ३१ कोटींचीसाखर भिजलीपरंडा (जि़उस्मानाबाद) : मंगळवारी सायंकाळी उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या वादळी वारे आणि पावसाने सोनारी येथील भैरवनाथ कारखान्याच्या गोडाऊनवरील पत्रे उडून गेल्याने तब्बल ३१ कोटी रुपयांची साखर भिजून इतरही २ कोटी रुपयांचे नुकसान झाले़गोदामात गतवर्षीची शिल्लक व या हंगामात उत्पादित केलेली जवळपास १ लाख ७८ हजार ८५ क्विंटल साखर ठेवण्यात आली होती़ मंगळवारी सायंकाळी सोनारी व परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसात कारखान्याच्या इमारतीचे व गोदामाचे पत्रे उडून गेले़ त्यामुळे गोदामात ठेवलेली जवळपास १ लाख १० हजार ते सव्वा लाख क्विंटल साखर भिजल्याचे बुधवारी मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी केलेल्या पंचनाम्यात नमूद केले आहे़
विदर्भ तापला; चंद्रपूर @ ४५.४, आणखी दोन दिवस उष्णतेची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 2:24 AM