अतुल कुलकर्णी ल्ल नागपूर
भाजपा-शिवसेना युती सरकारने नोंदणीकृत सावकारांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा सर्वाधिक फायदा विदर्भाला मिळू शकतो असे आकडेवारीतून समोर आले आहे. तर दुष्काळाची तीव्रता वाढत चाललेल्या मराठवाडय़ात बँका शेतक:यांना दारात उभे करेनाशा झाल्याने तिथेही अशा सावकारांची संख्या वाढली आहे.
2क्12-13 साली विदर्भातल्या 11 जिल्ह्यांत 3686 नोंदणीकृत सावकार होते. त्यांची संख्या 2क्13-14मध्ये कमी होऊन 2844वर येऊन थांबली आहे. त्याउलट चित्र मराठवाडय़ाचे आहे. या भागातल्या आठही जिल्ह्यांत गेल्या वर्षी 137क् सावकार होते; ज्यांची संख्या या वर्षी 16क्5 झाली आहे. विदर्भाच्या तुलनेत मराठवाडय़ाच्या सावकारांकडचे कर्ज तुलनेने कमी आहे, पण सावकारांच्या संख्येत झालेली वाढ मराठवाडय़ातली भीषणता दाखवण्यास पुरेशी आहे.
विदर्भातल्या शेतक:यांची संख्या 3,63,221 एवढी असून, त्यांच्यावर 317 कोटी 49 लाख 61 हजारांचे कर्ज आहे. तर मराठवाडय़ातल्या 42,645 शेतक:यांकडे 49 कोटी 67 लाख 73 हजारांचे कर्ज आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतक:यांना कर्ज द्यावे, असे शासनाने बजावले तसे होत नाही.
विदर्भ, मराठवाडय़ातील 19 जिल्ह्यांपैकी सर्वाधिक 814 सावकार नागपूर जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल अमरावती जिल्ह्यात 414 सावकार आहेत. विदर्भात सर्वात कमी म्हणजे 41 सावकार वाशिम जिल्ह्यात असून, त्यानंतर 51 सावकार असलेल्या गडचिरोलीचा नंबर लागतो. कर्ज घेणा:या शेतक:यांची संख्या पाहिली तर वेगळेच चित्र समोर येते. या दोन विभागांत मिळून सावकाराकडून कर्ज घेणारे सगळ्यात जास्त 95312 शेतकरी अकोल्यात आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या 9क्,49क् एवढी आहे. तर मराठवाडय़ात सर्वात जास्त 617 सावकार लातूर जिल्ह्यात असून, त्याखालोखाल प्रत्येकी 211 सावकार बीड आणि नांदेड जिल्ह्यात आहेत. मराठवाडय़ात सावकाराकडून कर्ज घेणारे सगळ्यात जास्त म्हणजे 14,674 शेतकरी नांदेड जिल्ह्यात असून, सगळ्यात कमी 311 शेतकरी औरंगाबाद जिल्ह्यात आहेत.
ही सर्व आकडेवारी अधिकृत सावकारांची आहे. याशिवाय नोंदणी नसणा:या सावकाराकडून कर्ज घेणा:यांची संख्या याहून अधिक असण्याची शक्यता आहे.