शिवसंग्राम आणि शिव हेल्थ क्लबचा अनोखा उपक्रम
सचिन राऊत
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ६ - शहरातील सर्वात मोठी दहीहंडी असो किंवा आगळे-वेगळे आंदोलने असो यामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या शिवसंग्रामचे नेते तथा शिव हेल्थ क्लबचे अध्यक्ष शिवा मोहोड यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी आणखी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदीनी तुकाराम चौकातील शिव हेल्थ क्लबवर तब्बल १०० फुट कापडाचे ध्वजारोहणाचा अभूतपूर्व सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
शिवसंग्राम आणि शिव हेल्थ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १५ आॅगस्ट रोजी सकाळी शिव हेल्थ क्लब येथे १०० फुट कापडाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यासाठी १०० फुटांचा तीन रंगाच्या कापडावर कामकाज करण्यात येत आहे. शिवा मोहोड यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात येत असलेल्या या अनोख्या ध्वजारोहन सोहळयाला सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण, जलसंपदा खात्याचे कार्यकारी अभियंता लोळे, खदान पोलिस स्टेशनचे ठानेदार छगनराव इंगळे विशेष उपस्थिीतीत राहणार आहे. स्वातंत्र्य दिनाचा हा उत्सव शिव हेल्थ क्लबवर अनोख्या आणि आगळया वेगळया पध्दतीने साजरा करण्यात येणार असून यासाठी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिव हेल्थ क्लबचे अध्यक्ष शिवा मोहोड यांनी केले आहे. १०० फुटांच्या कापडावर दोन टेलर दिवसरात्र काम करीत असून ज्या ठिकाणी हा ध्वज फडकविण्यात येणार आहे त्या ठिकाणी आवश्यक ती सुवीधा उपलब्ध करण्यात येत आहे. या ध्वजासाठी मोठा खांब तयार करण्यात येत असून यावर हा तिरंगा मोठया दिमाखात फडकणार आहे. शिवा मोहोड यांच्या या उपक्रमाची माहिती परिसरात पसरल्यानंतर हा ध्वज पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.